अहमदनगर: पोलिसासह दोघे ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
Breaking News | Ahmednagar: १२ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस हवालदाराला अ.नगर येथील लाच लुचपतच्या पथकाने रंगेहात पकडले.
श्रीरामपूर : शहर पोलिस ठाण्यातील दाखल गुन्ह्यामध्ये तक्रारदाराच्या भावाचे नाव न वगळण्याकरिता खासगी इसमामार्फत १२ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस हवालदाराला अ.नगर येथील लाच लुचपतच्या पथकाने रंगेहात पकडले. रघुनाथ आश्रुबा खेडकर (५५) व चहाची टपरी चालविणारा राजू शामकुमार श्रीवास्तव (४६) या दोघांना लाचलुचपतच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
दाखल फिर्यादीत तक्रारदाराच्या भावाच्या मालकीचा टाटा एचजीव्ही – टिप्पर भावाने २२ डिसेंबर २०२३ रोजी वाहन खरेदी पावती करून नातेवाईकास विकला होता. टिप्पर ५ फेब्रुवारी २०२४ रोजी अवैद्य मुरूम वाहतूक करताना येथील तहसील कर्मचाऱ्यांनी पकडून जमा केला होता, मात्र टिप्पर तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरीस गेला होता.
याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात ७ फेब्रुवारी २०२४ रोजी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास रघुनाथ खेडकर करीत होता. तक्रारदा तक्रारदाराकडून टिप्पर खरेदी करणाऱ्या नातेवायिकांसह चालकानेच टिप्पर चोरल्याचे निष्पन्न झाले. यामुळे तक्रारदाराचे नातेवाईक व टिप्पर चालकाला खेडकर याने नोटीस दिली होती. या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने खेडकर याने ३१ मे २०२४ रोजी तक्रारदारांची भेट घेऊन त्यांच्याकडे भावाला सीआरपीसी ९१ प्रमाणे नोटीस दिली होती. या गुन्ह्यामध्ये तक्रारदाराच्या भावाचे नाव न येवू देण्याकरिता त्याने तक्रारदारांकडे ४० हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदारासह टिप्पर खरेदी करणाऱ्या नातेवायिकांना त्याने १ जून २०२४ रोजी शहर पोलिस ठाण्यात बोलविले, अशा आशयाची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला प्राप्त झाली होती.
या तक्रारीनुसार १ जून रोजी लाच मागणीच्या पडताळणी दरम्यान खेडकर याने तक्रारदाराकडे पंचांसमक्ष २० हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती १२ हजार रुपयांची मागणी केली. सदर लाचेची रक्कम स्वीकारण्याची त्याने तयारी दर्शवली. लाचेची रक्कम खेडकर याने खासगी इसम राजू श्रीवास्तव या चहाची टपरी चालविणाऱ्याकडे देण्यास सांगितली. श्रीवास्तव यास खेडकर याच्या सांगण्यावरुन पंचांसमक्ष लाच स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले. खेडकर व खासगी इसम श्रीवास्तव या दोघांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Two with the police in the net of ‘bribery’
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study