अहमदनगर: गळफास घेऊन एकाची आत्महत्या
Breaking News | Ahmednagar: राहत्या घरापासून काही अंतरावर असलेल्या झाडाला नाईट पँटीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या.
श्रीरामपूर : तालुक्यातील निपाणी वडगाव येथील एकाने राहत्या घरापासून काही अंतरावर असलेल्या झाडाला नाईट पँटीच्या सहाय्याने गळफास घेऊन नुकतीच आपली जीवन यात्रा संपवली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक विठ्ठल चोपडे (वय ५५) असे मयत इसमाचे नाव असून या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी येथील शहर पोलीस ठाण्यात कळविली होती. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे, पोलीस हवालदार संतोष परदेशी, पोलीस नाईक किरण टेकाळे, पोलीस कॉन्स्टेबल वसीम इनामदार, संपत बडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देवुन पाहणी केली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना घटनेची
माहिती देऊन सदरचा मृतदेह येथील साखर कामगार रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन देण्यात आला. त्यानंतर निपाणी वडगाव परिसरात शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत पुढील तपास येथील शहर पोलीस करीत आहेत.
Web Title: Shrirampur One committed suicide by hanging
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study