Home अहमदनगर अहमदनगर: विजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू

अहमदनगर: विजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू

Breaking News | Ahmednagar: विहिरीवरील वीजपंप चालू का होत नाही, म्हणून पाहण्यास गेलेला तरुणाचा विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू.

Kashti Youth dies due to electric shock

काष्टी: विहिरीवरील वीजपंप चालू का होत नाही, म्हणून पाहण्यास गेलेला तरुणाचा विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. अमोल दत्तात्रय दळवी (वय ४०) असे मृत तरुणाचे नाव आहे.

 दि. १८ रोजी सकाळी अमोल दळवी हा विहिरीवरील वीजपंप चालू करण्यासाठी विहिरीवर गेला. परंतु वीजपंपाच्या खोक्यात वीजप्रवाह उतरल्यामुळे अमोलला विजेचा धक्का बसला. तो जागीच गतप्राण झाला. विहिरीवरील वीजपंप सुरू करण्यास गे- लेला अमोल घरी का येईना म्हणून कुटुंबीय गेले असता, अमोल विहिर- ीजवळ पडलेला दिसला. उपचारासाठी त्याला हलविण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मागे आई, वडील, पत्नी, भाऊ, मुलगा असा परिवार आहे.

Web Title: Kashti Youth dies due to electric shock

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here