Home संगमनेर संगमनेर: दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी पोलिसांनी केली जेरबंद

संगमनेर: दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी पोलिसांनी केली जेरबंद

Breaking News | Sangamner: दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ९ जणांच्या टोळीपैकी ३ जणांची टोळी आश्वी पोलिसांनी पकडली. (Arrested).

The gang, which was preparing to commit a robbery, was arrested

संगमनेर: पानोडी ते वरवंडी घाटात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ९ जणांच्या टोळीपैकी ३ जणांची टोळी आश्वी पोलिसांनी पकडली तर इतर जण पळून गेले पकडण्यात आलेल्या आरोपींकडे लोखंडी कटावणी, कटर, कुऱ्हाड, लोखंडी रॉड, दोरी, मिरची पावडर मिळून आली तर ४ लाख रूपये किमतीची एक महिद्रा कंपनीचा एम एच १७ सी.व्ही. १०८४ मालवाहतूक टेम्पो जप्त करण्यात आला

अधिक माहिती अशी की, आश्वी पोलिस कर्तव्यावर असतांना ११२ चे एम.डी.टी वर कॉलर नितीन बाळासाहेच गायकवाड रा- वरवंडी ता संगमनेर यांनी कॉल केला की पानोडी ते वरवंडी असलेले घाटात रस्त्याचे कडेला ९ इसम व त्यांचेकडे जीतो महींद्रा कंपणीचा एम.एच.१७ सी. व्ही १०८४ हा मालवाहतुक टेम्पो व लोखंडी कटावणी, कटर, कु-हाड, लाकडी दांडे, लोखंडी रॉड दोरी मिरची पावडर पुडी असे साहीत्य असून ते चोर असण्याची शक्यता आहे असे कळविलेने आश्धी पोलिस स्टेशनचे असलेले फिर्यादी घटनास्थळी गेले असता तेथे त्यांनी खात्री केली की कॉलर यांनी कळविलेली घटना सत्य असुन पानोडी ते वरवंडी घाटात रस्त्याचे कडेला दरोडा टाकण्याचे उद्देशाने दरोडेखोर दरोड्याची तयारीनिशी येणा-या जाण्या-या प्रवाशांची लुटमार करुन दरोडा टाकण्याच्या हत्यारानिशी तयार सापडले व त्यातील ३ इसमांना पकडले असून त्यांनी दरोडा टाकण्याचे तयारीत होते म्हणून फियांदी यांनी आश्वी पोलिस स्टेशनला फिर्याद दिली फिर्यादीचे सांगणेप्रमाणे फिर्याद दाखल केली आहे यावरून आरोपी आकाश सुनील पाळंदे, रोहीत भिरु मुळेकर सर्व रा- दाढ बु।। सिद्ध मकवाने (पूर्ण नाव माहीत नाही) रा दाढ बु।। कादीर (पुर्ण नाव माहीत नाही) रा. घुलेवाडी संगमनेर (नाव व पत्ता माहीती नाही) शरद उर्फ गोट्या हरीभाऊ पर्वत रा दाढ बु।। ता संगमनेर व इतर ३ अज्ञात आरोपी आहेत त्यांच्यावर भादवी कलम ३९९/४०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: The gang, which was preparing to commit a robbery, was arrested

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here