Home अकोले भंडारदरा परिसरात जोरदार पाऊस

भंडारदरा परिसरात जोरदार पाऊस

Breaking News | Rain: विजांच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात पावसास सुरूवात.

Heavy rain in Bhandardara area

भंडारदरा: नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरण परिसरात आणि पाणलोटात काल शुक्रवारी रात्री पावणे आठ ते साडेआठ दरम्यान जोरदार अवकाळी पाऊस बरसला.

काल परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण होते पण सायंकाळी नूर बदलला. त्यानंतर रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात पावसास सुरूवात झाली. काही वेळातच पावसाने वेग घेतला. या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. पाणलोटातही पाऊस झाल्याने धरणात काहीशी नवीन पाण्याची आवक होण्याची शक्यता आहे. गुरूवारीही पाऊस कोसळला होता. ११०३९ दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात आता केवळ १७३२ दलघफू (१५.७० टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणातून एकूण २५४० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

Web Title: Heavy rain in Bhandardara area

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here