Home महाराष्ट्र यूट्यूब पाहून नववी पास तरुणाचा चक्क बनावट नोटांचा छापखाना !

यूट्यूब पाहून नववी पास तरुणाचा चक्क बनावट नोटांचा छापखाना !

Breaking News | Mumbai Crime: बनावट नोटा तयार करून त्या वापरात आणणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक.

watching YouTube, the printing house of the ninth pass youth is quite fake

नवी मुंबई : बनावट नोटा तयार करून त्या वापरात आणणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडे २ लाख ३ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा आढळून आल्या आहेत. यूट्यूबवर बघून आवश्यक साहित्य जमा करून घरातच नोटा तयार करून सुमारे १ लाख रुपयांच्या नोटा त्याने चलनात आणल्या आहेत.

गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाच्या पथकाने बुधवारी रात्री सापळा रचून तळोजा एमआयडीसी परिसरातून प्रफुल्ल गोविंद पाटील (२६) याला ताब्यात घेतले. झडतीमध्ये त्याच्याकडे काही बनावट नोटा आढळल्या. त्याच्या घराची पाहणी केल्यावर त्याने सुरू केलेला बनावट नोटांचा छापखाना उघड झाला. शिवाय त्याने छापलेल्या २ लाख रुपये किमतीच्या १,४४३ बनावट नोटादेखील सापडल्या. त्यामध्ये पन्नासच्या ५७४, शंभरच्या ३३ व दोनशेच्या ८५६ बनावट नोटांचा समावेश आहे. दीड महिन्यात एक लाखाहून अधिक बनावट नोटा प्रफुल्ल हा नववी शिकलेला असून घरच्यांपासून एकटाच वेगळा राहतो. आर्थिक चणचण भागवण्यासाठी त्याने बनावट नोटा कशा तयार करायच्या याची माहिती यूट्यूबवर मिळवली होती.

याद्वारे त्याने १०, २०, ५०, १०० व २०० रुपयांच्या बनावट नोटा तयार करण्यास सुरुवात केली होती. मागील दीड महिन्यात त्याने एक लाखाहून अधिक किमतीच्या बनावट नोटा वापरात आणल्या आहेत.

Web Title: watching YouTube, the printing house of the ninth pass youth is quite fake

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here