संगमनेर: बॅगेतून एक लाख रुपयांसह चार मोबाईलची चोरी
Breaking News | Sangamner: झोपडीत ठेवलेल्या बॅगेतून एक लाख रुपये रोख व चाळीस हजार रुपयांचे चार मोबाईल असा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लांबवला.
संगमनेर: तालुक्याच्या पठारभागातील आंबीदुमाला येथील झोपडीत ठेवलेल्या बॅगेतून एक लाख रुपये रोख व चाळीस हजार रुपयांचे चार मोबाईल असा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लांबवला आहे. सदर घटना दि. ८ मे रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत घारगाव पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, आंबीदुमाला येथील बाळू भाऊ नरवडे यांच्या शेतातील नवीन विहिरीच्या कामाजवळ असलेल्या ताडपत्रीच्या झोपडीतील स्टीलच्या पेटीत बॅग ठेवलेली होती. या बॅगेतील एक लाख रुपये आणि चाळीस हजार रुपयांचे चार मोबाईल असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लांबवला आहे. याप्रकरणी सुभाष गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोहेकॉ. एकनाथ खाडे करत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पठारभागात केबल चोरी सुरू आहे. त्यामुळे आधीच शेतकरी भयभीत असताना पुन्हा अशी घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे.
Web Title: Four mobile phones along with one lakh rupees were stolen from the bag
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study