Home अकोले अकोलेत दुकानदारास चाकूने भोसकले

अकोलेत दुकानदारास चाकूने भोसकले

Breaking News | Akole: शहरातील बाजारतळावर एका तरुणाला भोसकाल्याची घटना.

Akole shopkeeper was stabbed with a knife

अकोले: अकोले शहरातील बाजारतळावर प्रदीप सुरेश वाघेरे (वय २४ रा. शाहूनगर, अकोले) या तरुणाला गणेश माने (कल्याण), गणेश चव्हाण, विजय बबन चव्हाण (अकोले) यांनी चाकूने भोसकल्याची घटना घडली असून यावेळी चाकूने भोसकून पळत असताना गणेश माने (कल्याण) यास संदीप सुरेश वाघिरे व आकाश सुरेश वाघीरे यांनी मारहाण केली असल्याची नोद पोलिसांत करण्यात आली आहे. याबाबत रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. जखमी असलेल्या प्रदीप सुरेश वाघीरे याची प्रकृती चिंताजनक असून त्याला अकोलेत प्राथमिक उपचार करून संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविले आहे.

अकोले बाजारतळात वाघीरे यांचे मसाल्याचे दुकान असून प्रदीप सुरेश वाघिरे (शाहूनगर) हे दकान आवरत असताना रात्री ८ वाजता गणेश माने (कल्याण), गणेश विजय चव्हाण, विजय बबन चव्हाण (रा. अकोले) यांनी तेथे येऊन गणेश माने (कल्याण) याने प्रदीप वाघीरे याच्या पोटात चाकूने सपासप वार केले व तेथून पळाला असता त्याचे मागे प्रदीपचे भाऊ संदीप सुरेश वाघीरे, आकाश सुरेश वाघीरे यांनी त्याचा पाठलाग करुन सर्वोदय कॉम्प्लेक्स जवळ गणेश माने यास धरून लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली.

मारहाणीत जखमी झाल्याने गणेश माने याच्यावर अकोले ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे तर चाकूने भोसकलेले प्रदीप वाघीरे यास अकोलेतील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत अकोले पोलिसांनी प्राथमिक नोंद करुन रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Web Title: Akole shopkeeper was stabbed with a knife

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here