लाचखोर पोलिस निरीक्षकाच्या घरात सापडले घबाड; सोन्याची बिस्किटे, दागिने अन्
Breaking News | Nashik Crime: लाचखोर पोलिस निरीक्षकाच्या घरात ६० लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने, सव्वा लाखाची रोकड व एक कोटी ७५ लाख रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रे.
नाशिक : प्रतिबंधात्मक कारवाई न करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून दीड लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय सखाराम शिंदे (रा. बीड) यांच्याकडे सुमारे ६० लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने, सव्वा लाखाची रोकड व एक कोटी ७५ लाख रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रे आढळून आली आहेत. या प्रकरणात अटक झालेल्या शिंदेसह इतर दोघांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
शिंदेसह हवालदार नितीन आनंदराव मोहने व अशोक साहेबराव पाटील (४५, दोघे रा. देवपूर, धुळे) अशी पकडलेल्या संशयित लाचखोर पोलिसांची नावे आहेत. तक्रारदारांवर प्रतिबंधात्मक कारवाई न करण्याच्या मोबदल्यात शिंदे यांच्या सांगण्यावरून इतर दोघांनी दोन लाख रुपयांची लाच मागितली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आल्यानंतर विभागाने सापळा रचला.
संशयितांनी पंचांसमोर तडजोड करीत दीड लाख रुपयांची लाच स्वीकारली. पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. तिघांविरोधात दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, विभागाने संशयितांच्या घराची झडती घेतली असता शिंदे यांच्या घरात घबाड सापडले, न्यायालयाने तिघांनाही दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
घबाड:
– ५९ लाख रुपयांचे ९०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने
– १० लाख रुपयांचे चांदीचे दागिने
– एक लाख २६ हजार रुपयांची रोकड
– स्वतः सह पत्नी व इतर नातलगांच्या नावे असलेली एक कोटी ७५ लाख रुपयांच्या मालमत्तेची कागदपत्रे मिळाली.
Web Title: found in the house of a bribe-taking police inspector
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study