Home पाथर्डी जाहिरातबाजीवर जनतेच्या पैशाची उधळपट्टी -आमदार प्राजक्त तनपुरे

जाहिरातबाजीवर जनतेच्या पैशाची उधळपट्टी -आमदार प्राजक्त तनपुरे

Breaking News | Ahmednagar: लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्र व राज्य सरकार विविध योजनांच्या नावाने मोठी जाहिरातबाजी. (Loksabha Election)

Loksabha Election Waste of public money on advertising

पाथर्डी : लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्र व राज्य सरकार विविध योजनांच्या नावाने मोठी जाहिरातबाजी करीत आहे. त्यासाठी सरकारकडे अमाप पैसा आहे. मात्र, शेतकऱ्याच्या दुधाला, कांद्याला भाव द्यायला सरकारकडे पैसा उपलब्ध नाही. सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची खरमरीत टीका करीत आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केंद्र व राज्य सरकारवर निशाणा साधला.

पाथर्डी तालुक्यातील कोल्हार कोल्हूबाई घाट सुधारणा ७ कोटी रुपये, कोल्हार गावठाण रस्ता १० लाख रुपये, श्रीक्षेत्र वृद्धेश्वर घाटशिरस-देवराई-त्रिभुवनवाडी- लोहसर-मिरी-आडगाव रस्ता १ कोटी ५३ लाख ९९ हजार रुपये, खांडगाव येथील जाधव वस्ती, ससे वस्ती व दानवे वस्ती येथील वीज चिचोंडी शिराळ : पाथर्डी तालुक्यातील विविध विकासकामांचे लोकार्पण आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते झाले.

रोहित्रांचे लोकार्पण, तसेच पांढरीपूल-मिरी-शेवगाव रस्ता १ कोटी ५६ लाख रुपयांच्या विकास कामांना प्रारंभ माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला.

आमदार तनपुरे म्हणाले, शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात तीव्र संतापाची लाट असून जाहिरातबाजीमुळे सरकारची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. कृषी व रोजगार हमी योजनेच्या कामाचे पैसे रखडले आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. कोल्हार, केशव शिंगवे, शिराळ, मिरी, लोहसर, खांडगाव, आठरे कौडगाव, देवराई, त्रिभुवनवाडी, घाटशिरस या तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामांना आमदार तनपुरे यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामाचेही लोकार्पण त्यांनी शनिवारी केले.

Web Title: Loksabha Election Waste of public money on advertising

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here