संगमनेर: विवाहितेचा छळ; सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल
Breaking News | Sangamner Crime: घर बांधण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणले नाही तसेच तुझ्या वडिलांना कोडे आहे असे म्हणून संगनमताने वेळोवेळी मारहाण, शिवीगाळ दमदाटी करून शारीरिक व मानसिक छळ.
संगमनेर: घर बांधण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणले नाही तसेच तुझ्या वडिलांना कोडे आहे असे म्हणून संगनमताने वेळोवेळी मारहाण, शिवीगाळ दमदाटी करून शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी सासरकडील लोका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत ज्योती सुनील आहेर (वय ३०) रा. घारगाव (हल्ली रा. नवशीचा मळा, घुलेवाडी, ता. संगमनेर) या विवाहितेने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात तीने म्हटले आहे की, २२ फेब्रुवारी २०१९ ते १५ जून २०२२ यावेळी ती सासरी नांदत असताना नवरा सुनील सोमनाथ आहेर, सासरा सोमनाथ बबन आहेर, सासू मंदा सोमनाथ आहेर (सर्व रा. घारगाव, ता. संगमनेर) ननंद सुवर्णा बाबजी शेटे (रा. जांबुत ता. संगमनेर), ननंद रूपाली विजय शेळके (रा. बोटा, ता. संगमनेर), ननंद सीमा संदीप चकवे (रा. पारेगाव पिंपरी, ता. जुन्नर) यांनी संगनमताने माहेरून घर बांधण्यासाठी पाच लाख रुपये आणले नाहीत व तुझ्या वडिलांना कोढे आहे. या कारणावरून वेळोवेळी मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला. विवाहितेच्या या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलींसानी फिर्यादीचा नवरा, सासू-सासरे आणि तीन ननंदा यांच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पो.हे.कॉ दिघे करत आहेत.
Web Title: Spouse harassment A crime has been filed against the in-laws
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study