Home Accident News लिफ्ट कोसळून मजुराचा मृत्यू; ठेकेदारावर गुन्हा दाखल

लिफ्ट कोसळून मजुराचा मृत्यू; ठेकेदारावर गुन्हा दाखल

Breaking News | Nashik Crime: नवीन लिफ्टची टेस्टिंगचे काम सुरू असताना बेरिंग निसटल्याने लिफ्ट तुटून सुमारे २० फुटांवरून खाली पडली. या अपघातामध्ये एक युवक ठार.

Laborer dies in lift collapse A case has been filed against the contractor

नाशिक: सातपूर औद्योगिक वसाहतीतील बाबासाई बेकरी कंपनीतील नवीन लिफ्टची टेस्टिंगचे काम सुरू असताना  बेरिंग निसटल्याने लिफ्ट तुटून सुमारे २० फुटांवरून खाली पडली. या अपघातामध्ये एक युवक ठार तर, तिघे गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता.१) सायंकाळी घडली होती. याप्रकरणी सातपूर पोलिसात ऋषीकेश इंजिनिअरिंग प्रा.लि.चे संशयित राहुल शिवाजी चोपडे यांच्याविरोधात मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

कुणाल चंदनवाल मोटवाणी (३२) असे मयत युवकाचे नाव आहे. शाहरुख खान (२५), दिनेश कमलेश बैठ (२५), कमलेश महेंद्र चंद्रवशी (२०) अशी जखमींची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, एशियन इलेक्ट्रॉनिक्ससमोर नव्याने निर्माण झालेल्या बाबा साई बेकरीत शुक्रवारी सायंकाळी मटेरिअल वाहून नेणाऱ्या लिफ्ट टेस्टिंगचे काम सुरू होते.

त्यावेळी संबंधित ठेकेदाराने निष्काळजीपणा केला. बेरिंग तुटल्याने लिफ्ट उंचावरून खाली पडली असता, चौघे जण गंभीर जखमी झाले. मोटवाणी यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना मृत्यू झाला. जखमी तिघांवर उपचार सुरु आहेत. सातपुरातील पवन चंदवाणी यांच्या फिर्यादीनुसार संशयिताविरोधात मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, हवालदार सूर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Laborer dies in lift collapse A case has been filed against the contractor

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here