Home राष्ट्रीय Budget 2020: अर्थसंकल्पातून काय महाग आणि काय स्वस्त झाले ते घ्या जाणून

Budget 2020: अर्थसंकल्पातून काय महाग आणि काय स्वस्त झाले ते घ्या जाणून

नवी दिल्ली(Budget 2020): आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अर्थमंत्र्यांनी कर टप्प्यांमध्ये बदल केले आहेत. ५ ते ७.५ लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना १० टक्के कर आकाराला जाणार आहे. तर ७.५  ते १० लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना १५ टक्के कर आकाराला जाणार आहे. १० ते १२.५ लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना २०  टक्के कर आकाराला जाणार आहे. ज्यांचे उत्पन्न १२.५ ते १५  लाख उत्पन्न असणाऱ्यांना  २५ टक्के कर आकाराला जाणार आहे. १५ लाखाच्या वरती  उत्पन्न असणाऱ्यांना  ३०  टक्के कर आकाराला जाणार आहे.

करदात्यांना दिलासा देत काही वस्तू महाग तर काही स्वस्त करण्यात आले आहे. हे नवे दर १ एप्रिलपासून लागू होतील.

कोणत्या वस्तू महाग झाल्या आहेत ते :

सिगारेट, तंबाखू

आयात केलेली वैद्यकीय उपकरणे

आयात केलेली फुटवेअर, फर्निचर

मोबाईल

स्वयंपाकाची भांडी, स्टील

वॉल फॅन्स

वाहने आणि वाहनांचे सुटे भाग

कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत ते :

प्रक्रिया न केलेली साखर

फॅटस काढण्यात आलेले दुध

अल्कोहोलचा समाविष्ट असलेली विशिष्ट पेय

सोया फायबर, सोया प्रोटीन

लाईट वेट कोटेड पेपर

अग्रो अनिमल बेस्ड उत्पादन


जाहिरात: साई इस्टेट कन्सल्टंट अॅण्ड डेव्हलपर्स, संगमनेर

शेतजमीन, प्लॉट, बंगले, गाळा, गुंठेवारी इ. खरेदी विक्रीचे व्यवहार खात्रीशीर केले जातील. तसेच शेतीचे प्लॉट बिगर शेती (N.A.) केले जातील. गुंतवणुकीसाठी प्लॉट उपलब्ध. संपर्क: 9405404536


Website Title: budget 2020 became expensive and what cheap

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here