अहमदनगर: आजी-नातवाच्या खुनाबद्दल दोघांना जन्मठेप
Breaking News | Ahmednagar: परप्रांतीय कुटुंबातील आजी-नातवाच्या खुनाच्या गुन्ह्यात दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व सात हजार रुपयांचा दंडाची शिक्षा.
नगर : शेवगाव येथे परप्रांतीय कुटुंबातील आजी-नातवाच्या खुनाच्या गुन्ह्यात दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व सात हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली.
नेकपालसिंग पोटियासिंग चितोडिया (वय ६५), कमलसिंग ऊर्फ तोतासिंग उर्फ राकेश नेकपालसिंग चितोडिया (वय ३०, दोघे मूळ रा. केशरनगर, जामनेर रोड, भुसावळ, ता. जि. जळगाव) अशी त्यांची नावे आहेत. कमलाबाई कागडियासिंग चितोडिया (वय ६५), नातू सुनीलसिंग ऊर्फ टकलूसिंग बुटासिंग चितोडिया (वय १०, रा. चितोडगड, राजस्थान) अशी मृतांची नावे आहेत. शेवगाव-पाथर्डी रस्त्यावरील ईदगाह मैदानावर २३ जानेवारी २०२१ रोजी अंदाजे ५५ ते ६० वर्षे वयाच्या अनोळखी महिलेचा खून झाला. तिचे मुंडके गायब होते. तसेच १२ ते १५ वर्षांच्या अनोळखी मुलाचाही डोक्यात टणक वस्तूने मारून खून करण्यात आला होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीना अटक केली. गुन्ह्यात वापरलेले लाकडी काठीचे तुकडे, मयत महिलेजवळील चोरून नेलेला चांदीचा हार असा मुद्देमाल जप्त केला. मयत महिलेच्या फेकून दिलेले मुंडक्याचाही शोध घेतला. तपासी अधिकारी प्रभाकर पाटील यांनी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले.
सरकारी अभियोक्ता अॅड. मंगेश दिवाणे यांनी तपासी अधिकारी प्रभाकर पाटील यांची साक्ष नोंदविली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अॅड. अनिल डी. ढगे यांनी बाजू मांडली.
Web Title: Two life imprisonment for the murder of grandmother and granddaughter
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study