Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग! हात तुटलेला पुरुषाचा मृतदेह आढळला

अहमदनगर ब्रेकिंग! हात तुटलेला पुरुषाचा मृतदेह आढळला

Breaking News | Ahmednagar: रेल्वे स्टेशन परिसरात हात तुटलेला पुरुषाचा मृतदेह आढळून खून की आत्महत्या.

man's Dead body was found with a broken arm

पारनेर: तालुक्यातील रांजणगाव रोड रेल्वे स्टेशन परिसरात हात तुटलेला पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे हा अपघात, आत्महत्या की खून अशी परिसरात चर्चा रंगली आहे.

याबाबत रांजणगाव रोड रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर बाबासाहेब खेडकर यांनी सुपा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मागील आठवड्यात मनमाड दौड रेल्वे मार्गावर रांजणगाव रोड रेल्वे स्थानक परिसरात एक पुरुषाचा मृतदेह पडला आसल्याचे काही नागरिक व रेल्वे कर्मचाऱ्यांच्या नजरेस आले. याबाबत त्यांनी सुपा पोलिसांना सांगीतले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे. तर सुपा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

१० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अभ्यासक्रम, इंग्रजी ग्रामर आणि बरेच काही – एजुकेशन पोर्टल 

सदर मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४० ते ४५ च्या दरम्यान असुन उंची ५.४ आहे, रंग सावळा असुन डोक्याचे केस विरळ आहेत. अंगात लुंगी घालेली असून त्या मृत व्यक्तीचा उजवा हात मनगटापासन तुटलेला आहे.

Web Title: man’s Dead body was found with a broken arm

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here