Home अहमदनगर अहमदनगर: कर थकबाकीदारांचे नावे लावली चौकाचौकात

अहमदनगर: कर थकबाकीदारांचे नावे लावली चौकाचौकात

Breaking News | Ahmednagar: अहमदनगर महापालिकेच्या वतीने थकबाकी असणाऱ्या मालमत्ता धारकांच्या नावाचे फलक शहरातील विविध चौकात लावण्यात आले.

names of the tax defaulters were put in the square

अहमदनगर : वारंवार आवाहन करून देखील कराची थकबाकी भरली जात नाही. यामुळे अहमदनगर महापालिकेच्या वतीने थकबाकी असणाऱ्या मालमत्ता धारकांच्या नावाचे फलक शहरातील विविध चौकात लावण्यात आले आहेत. महानगरपालिकेने लावलेल्या थकबाकी दारांच्या नावांमध्ये अनेक मोठमोठ्या लोकांचा समावेश आहे. मार्च एन्ड आल्याने मनपाने जास्तीत जास्त वसुली व्हावी, यासाठी ही पद्धत राबविली आहे.

अहमदनगर महापालिकेने थकीत कर वसुलीसाठी गेल्या वर्षभरात मालमत्ता जप्तीची कारवाई केली. तसेच वर्षाखेरीस शास्तीत ७५ टक्के माफी देखील दिली. तरी देखील थकबाकीदारांनी कर भरण्यासाठी कानाडोळा केला. यामुळे अखेर अहमदनगर मनपाने कर बुडव्यांच्या नावाचे फ्लेक्स शहरातील चौकाचौकात लावले आहेत. महापालिकेने आतापर्यंत ८४ कोटी रुपयांची थकबाकी वसूल केली आहे.

अजूनही करोड रुपये मालमत्ता धारकांकडे थकलेले असून अनेकवेळा संधी देऊनही थकीत कर भरला जात नसल्याने नागरिकांनी कर भरून महापालिकेला सहकार्य करावे; अन्यथा पुढील काळात कडक कारवाई केली जाईल असे आवाहन महानगरपालिकेचे उपायुक्त सचिन बांगर यांनी केले आहे.

Web Title: names of the tax defaulters were put in the square

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here