Home अहमदनगर पोलिसांनी ‘खाक्या’ दाखवताच नगर अर्बन बँकेची झालीय पोलखोल

पोलिसांनी ‘खाक्या’ दाखवताच नगर अर्बन बँकेची झालीय पोलखोल

Breaking News | Ahmednagar:  संचालकांवर बँकेच्या कर्जदारांकडून रक्कमा स्विकारल्याबद्दल पोलीस कोठडीतला मुक्काम वाढत आहे. (Nagar Arban bank Scam)

the police showed 'Khyakya', Nagar Urban Bank scam became a mess

अहमदनगर: 2014 ते 2023 असे 10 वर्षांपैकी तब्बल 8 वर्षे सत्तेवर असलेल्या संचालक मंडळाने मात्र एकसुध्दा पोलीस फिर्याद दाखल केली नाही. यावरुन सर्व काही सुर्यप्रकाशाइतकं स्पष्ट होते, की सर्व संचालक ऐकमेकांना सांभाळून घेत होते. आता पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखविल्यावर सर्व पोलखोल होत आहे. नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरण राज्यभर गाजले आहे.

नगर अर्बन बँकेत झालेल्या घोटाळेबद्दल दाखल झालेल्या पोलीस फिर्यादी उदा चिंचवड 22 कोटी घोटाळा, चिल्लर घोटाळा, शेवगाव सोनेतारण घोटाळा, तोफखाना पोलीस स्टेशन बनावट व्हँल्यूयेशन रिपोर्ट घोटाळा फिर्याद या सर्व फिर्यादी प्रशासक काळात म्हणजे 2020 व 2021 मध्ये दाखल झाल्या. माजी संचालक राजेंद्र गांधी म्हणजे बँक बचाव कृती समितीने 2022 मध्ये दाखल केलेल्या फिर्यादीतून 292 कोटींचा घोटाळा उघड झाला.

नगर अर्बन बँकेतील घोटाळ्यास कारणीभूत व आतापर्यंत अटकेत असलेल्या संचालकांवर बँकेच्या कर्जदारांकडून रक्कमा स्विकारल्याबद्दल पोलीस कोठडीतला मुक्काम वाढत आहे. त्यांना जामीनही मिळत नाही.

काही धक्कादायक निरीक्षणे :

हे सर्व गैरव्यवहार 2016, 2017, 2018 मधील आहेत आणि आज 2024 मध्ये उघडकीस येत आहेत. म्हणजे तब्बल 6 ते 8 वर्ष हे घोटाळे लपवून ठेवले गेले. बँकेवर 2014 पासून 2024 पर्यंत एकाच गटाची सत्ता होती. म्हणजे हे घोटाळे लपवून ठेवण्यात सर्वच संचालकांनी ऐकमेकांना मदत केल्याचं स्पष्ट होत आहे.

अशा प्रकारचे घोटाळ्यांची पोलीस फिर्याद दाखल करणे हे संचालक मंडळाचे कर्तव्य व जबाबदारी असते. परंतू 2014 ते 2024 पर्यंत एका ही संचालकाने ही पोलीस फिर्याद दाखल व्हावी, म्हणून प्रयत्न केले नाहीत. म्हणजे सर्व काही ‘तेरी भी चुप मेरी भी चुप’ असाच कारभार 2024 पर्यत चालला होता. स्व. सुवालालजी गुंदेचा यांच्यासारखे ज्येष्ठ व श्रेष्ठ व्यक्तीनं ऑक्टोबर 2018 मध्ये जाहीर पत्रकार परिषद घेवून बँकेतील भ्रष्टाचाराची पोलखोल केली होती. त्यावेळी त्यांची कन्या साधना भंडारी वगळता इतर एकाही संचालकांनी स्व. सुवालालजींना साथ दिली नाही. याउलट स्व. सुवालालजींनी जे बोगस कर्जप्रकरण 2018 मध्ये थांबविले होते, तेच कर्जप्रकरण जुलै 2019 मध्ये मंजूर करण्यात आलं. या कर्जाची आजपर्यंत 1/- रूपया परतफेड झालेली नाही.

संचालकांनी ज्या ज्या कर्जखातेतून रक्कमा स्विकारल्या ते सर्व कर्ज खाते एनपीएमध्ये गेले व बँकेचा एनपीए वाढत जावून बँकेवर निर्बंध आले. शेवटी बँक बंद झाली. म्हणजे बँक बंद करण्यामागे ज्या ज्या संचालकांनी कर्जदाराच्या खात्यातून रक्कमा घेतल्या व या दोषी संचालकांना साथ देणारे इतर संचालकच कारणीभूत आहेत. कारण कोणीही कोणाच्या खोट्या कामाला फुकट साथ देत नाही, हे वास्तव नाकारता येणार नाही.

Web Title: the police showed ‘Khyakya’, Nagar Urban Bank scam became a mess

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here