Home संपादकीय तिळगुळ घ्या, गोड बोला ! मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा

तिळगुळ घ्या, गोड बोला ! मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा

मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा

मकरसंक्रातीला सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. याच दिवशी दक्षिणायन संपून उत्तरायण सुरु होते. या दिवशी तीळ आणि गुळ देण्याची प्रथा आहे. यामागे शास्त्रीय कारण आहे. जेव्हा उत्तरायण सुरु होते. तेव्हा थंडी हळूहळू कमी होते. आणि उष्मा वाढू लागतो. अर्थातच रात्र कमी होते आणि दिवस मोठा होत जातो. हवामानातही बदल होतो. आपल्या शरीरात उष्णता वाढावी हवामानातील बदल शरीराने स्वीकारावा यासाठी उष्मांक जास्त असलेले तीळ आणि गुळ हे पदार्थ खाल्ले जातात.

या सणासाठी देशभरातील नावे वेगळी आहेत. पण भावना एकच पंजाबमध्ये याला लोहडी, दक्षिण भारतात पोंगल, मध्यप्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशात संकारात आणि पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये खिचडी नावाने साजरा केला जातो. गुजरातमध्ये याला उत्तरान असे म्हणतात. हे नाव उत्तरायणवरून पडले आहे.

मकरसंकारांतीचा काळ हा संक्रमणाचा असतो. सण साजरा करताना आपल्या मनाला आनंद,उभारी मिळते. परंतु बदलत्या काळात सामाजिक संक्रमनाची गरज आहे. हा  सण एकामेंकामध्ये प्रेम गोडवा निर्माण करणारा आहे. तिळगुळ देणे, हळदी कुंकू करणे हे रथसप्तमी पर्यंत चालते.

मकर संकारातीच्या साजरीकरणाला स्नेहाचा भाव आहे. आपल्याला परस्परसंभंध तणावरहीत असावे असे वाटते. म्हणून तीळगुळ देताना नेहमी आवर्जून सांगतो. “तीळगुळ घ्या, गोड बोला”

आठवण सूर्याची,

साठवण स्नेहाची,

कणभर तीळ,

मनभर प्रेम,

गुळाचा गोड़वा,

स्नेह वाढवा…

“तिळगुळ घ्या गोड गोड बोला”

Website Title: Makar Sankranti in Marathi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here