Home बीड मुंबईतले रस्ते साफ करा आम्ही येतोय, मुंबईला जाण्याची तारीख ठरली मनोज जरांगे...

मुंबईतले रस्ते साफ करा आम्ही येतोय, मुंबईला जाण्याची तारीख ठरली मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil: आपण निघालो की सरकार हात जोडेल. आंदोलन तुम्हाला नक्की जड जाणार असा इशारा जरांगेंनी दिला.

Maratha reservation date to go to Mumbai has been decided, Manoj Jarange Patil

Maratha Reservation: बीड मध्ये सरकारला इशारा २० तारखेच्या आत आरक्षण देता आले तर बघा. मी मेलो तरी चालेल पण आरक्षण मिळालंच पाहिजे. आता मोठे आंदोलन मुंबईत होणार आहे. मुंबईतले रस्ते साफ करा आम्ही येतोय. २० जानेवारी पासून मुंबई येथे आझाद मैदानावर आमरण उपोषणाची घोषणा मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी केली आहे. मुंबईला शांततेत जाण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे. जो हिंसा करेल तो आपला नाही लक्षात ठेवा. जाताना कोठेही जाळपोळ करायची नाही. कुणालाही करू द्यायची नाही. शांततेची ताकद काय असते सरकारला दाखवून द्यायची आहे. आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही. आता आरक्षण घेऊनच परत येणार आहे.

मराठा आंदोलनाचा कुणीही नेता नाही. मी देखील नाही. २० तारखेला तयारी करा. शांततेची आंदोलन होणार आहे. छगन भुजबळ म्हणजे बुजगावणं. भुजबळांनी शहाण व्हावं. आमच्या नादी लागू नका. मराठ्यांना अडवण सोपं नाही. मुंबईला जाण्याची तयारी करा.

मुंबईत १८ तारखेपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आला आहे. २० तारखेला महाआंदोलन होणार असे जरांगे पाटील यांनी बीड येथील महाप्रलय सभेत जाहीर केले आहे. बीड मध्ये आज अंदाजे १० ते १२ लाखांचा जनसमुदाय उपस्थित होता. आंदोलनाची दिशा त्यांनी आज ठरवली आहे. 

बीडमध्ये आज मराठ्यांच्या एकजुटीचा महाप्रलय जमलाय. सभेची गर्दीवरून मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांना टोला लगावला. त्याच बरोबर त्यांनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिलाय. माझ्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाबत जर कोणी बोलला तर त्याला सुट्टी नाही. देशातील मोठी जात तुम्ही संपवण्याचा घाट घातलाय. सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर पुढचं होणारं आंदोलन तुम्हाला नक्की जड जाणार असा इशारा जरांगेंनी दिलाय.

Web Title: Maratha reservation date to go to Mumbai has been decided, Manoj Jarange Patil

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here