अहमदनगर: सरपंचांच्या मुलांवर प्राणघातक हल्ला
Ahmednagar | Newasa News: वकील असलेल्या मुलावर जमिनीचे वादातून प्राणघातक हल्ला केल्याची घटना ; ९ जणांवर जिवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह विविध गुन्हे (Crime) दाखल.
नेवासा: तालुक्यातील आदर्श गाव वडुले ग्रामपंचायतीचे सरपंच दिनकरराव गर्जे यांच्या वकील असलेल्या मुलावर जमिनीचे वादातून प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवार ३० नोव्हेंबर रोजी दुपारी घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरुन ९ जणांवर जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत प्रसाद दिनकर गर्जे (वय ३१) धंदा वकीली/शेती रा. बडुले यांनी नगरच्या सिव्हील हॉस्पीटल येथील सर्जरी वार्डमध्ये उपचार चालू असताना दिलेल्या जबाबावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत म्हटले की, ३० नोव्हेबर रोजी मी, भाऊ, पत्नी व भावजई असे घरी असताना माझे आई वडील हे चारचाकी वाहनात सकाळी १० वाजेच्या सुमारास देवगड दर्शन करता चालले होते. थोड्याच वेळात परत घरी आले व आम्हाला म्हणाले की, त्यांना नांदूर-वडुले रोडवर प्रभाकर एकनाथ गर्जे याने आडवून गाडी थांबवून मी घेणार होतो ती जमीन तू विकत का घेतली? असे म्हणून शिवीगाळ करुन तुला व तुझ्या कुटुंबाला जिवे ठार मारील अशी धमकी दिली. तेव्हा ते आम्हाला म्हणाले की, तुम्ही बाहेर कोठे जावू नका असे म्हणून परत देवगड दर्शनाकरीता निघून गेले.
त्यानंतर थोड्याच वेळात १२:३० वाजेच्या सुमारास प्रभाकर एकनाथ गर्जे, वसंत एकनाथ गर्जे, एकनाथ महादू गर्जे, अर्जुन मच्छिद्र आतकरे, इंद्रजित अर्जुन आतकरे, गिता प्रभाकर गजें, शितल वसंत गर्जे, सिताबाई एकनाथ गर्जे, रंजना अर्जुन आतकरे हे सर्व रा. वडुले ता. नेवासा हे आमच्या घरात घुसले व आम्हाला शिवीगाळ करत तुम्हाला जिवे ठार मारतो असे म्हणाले. त्यांचे हातातील कुन्हाड, कोयता, कत्ती, गज, विळे, लाकडी दांडा अशी हत्यारे होती. तेव्हा मी त्यांना तुम्ही घरात का घुसले, तुम्ही घराबाहेर जा असे म्हणालो असता त्यातील प्रभाकर एकनाथ गर्जे याने त्याचे हातातील कुन्हाडीने माझे डोक्यावर बार केला. तो वार माझ्या डावे हाताचे दंडावर लागला. तसेच अर्जुन मच्छिंद्र आतकरे याने त्याचे हातातील कत्तीने माझे गळ्यावर वार केला. तो माझ्या हनुवटीवर लागला. तसेच त्याचा दुसरा वार माझे छातीवर लागला. त्याचवेळी माझा लहान भाऊ ज्ञानेश्वर गर्जे यास बसंत एकनाथ गर्जे हा म्हणाला
की तुमचे एकएकाचे मुंडके तोडतो व तुम्हाला जिवेच मारतो. असे म्हणून त्याने माझा भाऊ ज्ञानेश्वर याचे गळ्यावर त्याचे हातातील कोयत्याने वार केला. परंतू भाऊ ज्ञानेश्वर याने तो वार त्याचे डावे हातावर घेतला व तो जखमी झाला.
त्यास एकनाथ महादू गर्जे यांनी त्याचे हातातील गजाने ज्ञानेश्वर याचे डावे बरगडीस मारहाण केली व गंभीर जखमी केले. त्यावेळी माझी पत्नी व भावजई आमच्या गंभीर जखमा पाहून आम्हास सोडवण्याकरीता आल्या त्यावेळी रंजना अर्जुन आतकरे, गिता प्रभाकर गर्जे, शितल वसंत गर्जे, सिताबाई एकनाथ गर्जे यांनी त्यांचे हातातील विळ्याने व काठ्याने मारहाण करुन यांचे मुंडके कापून टाका असे म्हणत होते. तसेच इंद्रजित अर्जुन आतकरे हा त्याचे हातातील बिळा उगारुन यांना आज संपवून टाका असे म्हणत होता.
आमच्या भांडणाचा आरडा ओरडा ऐकून शेजारील राहणारे नंदू मुरलीधर गर्जे व शुभम खंडू गर्जे हे तेथे आले व तेव्हा वरील इसम तेथून निघून गेले. आम्ही दोघे रक्तबंबाळ झालो. आम्हाला जखमी अवस्थेत घरच्या चारचाकी
वाहनातून ग्रामीण रुग्णालय नेवासा येथे उपचारार्थ सुभम गर्जे याने नेले. त्यानंतर तेथून आम्हाला गंभीर जखमा झाल्याने तेथील डॉक्टरांनी तपासून सिव्हील हॉस्पीटल येथे पाठविले. त्यानंतर सिव्हील हॉस्पीटल येथुन भाऊ ज्ञानेश्वर यास गंभीर जखमी असल्याने खासगी हॉस्पीटल साईदिप येथे उपचारकामी दाखल केले आहे. माझ्यावर सिव्हील हॉस्पीटल अ.नगर येथे उपचार चालू आहेत. आम्ही दवाखान्यात येत असताना सुध्दा वरील इसमांनी आमची गाडी आडवण्याचा प्रयत्न करुन दगड मारले होते.
या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात प्रभाकर एकनाथ गर्जे, वसंत एकनाथ गर्जे, एकनाथ महादू गर्जे, अर्जुन मच्छिंद्र आतकरे, इंद्रजित अर्जुन आतकरे, गिता प्रभाकर गर्जे, शितल वसंत गर्जे, सिताबाई एकनाथ गर्ने व रंजना अर्जुन आतकरे या ९ जणांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३०७, ३२६, ३४१, ४५२, ३२३, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
Web Title: Sarpanch’s children assaulted Crime Filed
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App