भावाला खेळण्यासाठी पाठवून बारावीच्या मुलीची आत्महत्या
Nagapur Crime: सारखी मोबाइलवर काय असतेस, असे म्हणत आई-वडील रागावल्यामुळे बारावीला शिकणाऱ्या एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide).
नागपूर : सारखी मोबाइलवर काय असतेस, असे म्हणत आई-वडील रागावल्यामुळे बारावीला शिकणाऱ्या एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी घडली. खुशी दिलीप पनेकर (वय १७, रा. गल्ली नं. २ शास्त्रीनगर) असे तिचे नाव आहे.
संचिता १२ वी विज्ञान शाखेला शिकत होती. तिच्या कुटुंबात आई-वडील आणि लहान भाऊ आहे. तिचे आई-वडील मजुरीचे काम करतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संचिता मोबाइलवर बराच वेळ घालवित असल्यामुळे आई-वडील तिला रागावले होते. त्यामुळे रागाच्या भरात तिने लहान भावाला खेळण्यासाठी बाहेर पाठविले. त्यानंतर आतून दरवाजा लावून सिलिंग फॅनला ओढणी बांधून गळफास घेतला.
Web Title: 12th-grade girl commits suicide by sending her brother to play
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App