ऐन दिवाळीत पोलीस कॉन्स्टेबलची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या
Solapur Crime: एका पोलीस कॉन्स्टेबलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना.
सोलापूर: जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केशवनगर पोलीस लाईन परिसरात एका पोलीस कॉन्स्टेबलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ऐन दिवाळीत समोर आली आहे. राहुल शिरसाट असं आत्महत्या करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे
घटनेची माहिती कळतात वरिष्ठ अधिकारी आणि सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत राहुल शिरसाट यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. ऐन दिवाळीत उत्साही वातावरण असताना शिरसाट यांनी इतकंच टोकाचं पाऊल का उचललं? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत राहुल शिरसाट सोलापूर पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. बुधवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे ड्युटीवर जाणार होते. मात्र, त्याआधी राहुल यांनी स्वत:वर गोळी झाडून आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या आत्महत्येने शिरसाट कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, पोलिसांनी राहुल यांचा मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेनं पोलीस दलातून हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
Web Title: A police constable committed suicide by shooting himself on Diwali
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App