Home क्राईम पुणे हादरले! भररस्त्यात सराफावर सहा गोळ्या झाडत लुटले

पुणे हादरले! भररस्त्यात सराफावर सहा गोळ्या झाडत लुटले

Pune Crime: ऐन दिवाळीच्या तोंडावर दुकान बंद करून घरी जाणाऱ्या सराफावर गोळीबार (Firing) केल्याची घटना.

Sarafa was robbed by Firing six bullets in Bharra

पुणे: ऐन दिवाळीच्या तोंडावर पुण्यात धक्कादायक बातमी समोर आली आहे. बुधवारी रात्री दुकान बंद करुन घरी जाणाऱ्या सराफावर भररस्त्यात गोळीबार करण्यात आला. गोळीबाराच्या या घटनेत सराफ व्यावसायिक प्रतिक मदनलाल ओसवाल( वय 35) गंभीर जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी त्यांच्यावर सहा गोळ्या झाळत त्यांच्याकडून सोने चांदीची बॅग पळवून नेली. त्यानंतर आरोपी फरार झाले. या घटनेमुळे पुणे शहर हादरले आहे.

प्रतिक मदनलाल ओसवाल यांची सराफ पेढी हडपसरमधील सय्यदनगर भागत आहे. बुधवारी रात्री ९.३० च्या सुमारास दुकान बंद करुन ते वडिलांसोबत दुचाकीवरुन घरी निघाले होते. त्यावेळी बी.टी.कवडे रस्त्यावर असताना दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्यांना रोखले. काही कळण्याच्या आता त्यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. त्यातील तीन गोळ्या त्यांना लागल्या. त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्याकडे दागिने असलेली बॅग पळवून नेले. ओसवाल यांच्या मांडीवर आणि गालावर गोळी लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ऐन दिवाळीच्या तोंडावर पुण्यातील प्रसिद्ध सराफा व्यावसायिकावर गोळीबार झाल्यामुळे पुणे शहर हादरले आहे. गोळीबार करून हल्लेखोरांनी कोट्यावधी रुपयांचे सोने लुटले आहे. हल्लेखोरांनी पाळत ठेऊन हा प्रकार केला आहे. घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत.

Web Title: Sarafa was robbed by Firing six bullets in Bharra

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here