Home अकोले मुलांमध्ये सर्वोदय खिरविरे तर मुलींमध्ये लिंगदेव विद्यालयाने पटकविला स्मृतीचषक

मुलांमध्ये सर्वोदय खिरविरे तर मुलींमध्ये लिंगदेव विद्यालयाने पटकविला स्मृतीचषक

कै.सावित्रीबाई मदन स्मृतीचषक मॅरेथॉन स्पर्धा संपन्न
पिंपळगाव नाकविंदा/प्रतिनिधी – शरीर चांगले असेल तर आपण प्राणांगत होऊ शकतो. सातत्य असेल तर यश निश्चित प्राप्त होते.खेळामुळे शरीर, मन, व्यक्तीमत्व सुधारते. असे प्रतिपादन अॅड. सदाशिव थोरात यांनी केले.
अकोले तालुक्यातील राजुर येथील सत्यनिकेतन संस्था आयोजित कै. सावित्रीबाई मदन स्मृतीचषक आंतरविद्यालयीन तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अॅड. सदाशिव थोरात खेळाडुंना मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी सत्यनिकेतन संस्थेचे सचिव टि.एन.कानवडे, सहसचिव मिलिंद उमराणी, व्यवस्थापक प्रकाश महाले, सदस्य एम.के. बारेकर, उन्नती सेवा मंडळाचे मंगलदास भवारी, संचालक विजय पवार, विलास पाबळकर, प्राचार्य मनोहर लेंडे, उपप्राचार्य लहानु परबत, प्राचार्य अंतुराम सावंत, मुख्याध्यापक के.एल. नवले, संजय शिंदे, पर्यवेक्षक शिवाजी नरसाळे,रजनी टिभे यांस ह सहभागी शाळांचे क्रिडा शिक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी उपस्थित होते.
मॅरेथॉन स्पर्धा सर्वोदय विदयालय, बस स्टँड, डॉ.गोडगे हॉस्पीटल, सचिवालय, मधुकरराव पिचड विदयालय, निवास्थान असे एकूण तीन किलोमीटर  मार्ग होता.यामध्ये एकूण एकशे दोन मुलामुलींनी सहभाग घेतला.
यामध्ये मुलांच्या गटात खिरविरे येथील सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयातील साहेबराव सोमा उघडे यांने प्रथम क्रमांक तर मुलींच्या गटात लिंगदेव येथील न्यु हायस्कुल विदयालयातील साक्षी भाऊसाहेब फाफाळे हिने प्रथम क्रमांक मिळवून फिरता स्मृतीचषक मिळविला. तसेच मुलांच्या गटात राजुर येथील
सर्वोदय विदया मंदिर विदयालयातील ऋषीकेश किसन कुदनर याने द्वितिय क्रमांक तर खिरविरे विदयालयातील युवराज एकनाथ डगळे याने तृतीय क्रमांक मिळविला.त्याचप्रमाणे मुलींच्या गटात लिगदेव विद्यालयातील ज्योती एकनाथ गावंडे हिने द्वितीय क्रमांक तर साक्षी संदिप हाडवळे हिने तृतीय क्रमांक मिळविला. सहभागी प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र व टि शर्ट देण्यात आला.
मॅरेथॉन स्पर्धत क्रिडा शिक्षक भाऊसाहेब बनकर, भारत भोसले, जालिंदर आरोटे, संपत धुमाळ, प्रा.विनोद तारू यांनी यशस्वी नियोजन केले. त्यांना सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहसचिव मिलिंद उमराणी यांनी केले. सुत्रसंचलन संतराम बारवकर यांनी तर प्राचार्य मनोहर लेंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.किशोर देशमुख यांनी सुमधुर पसायदान गायन करून कार्यक्रमाची सांगता केली.
Website Title: Latest News Savitribai Madan Memorial Marathon Competition

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here