आरक्षण देईल तर ते आमचंच सरकार, फक्त थोडा वेळ द्या; भाजप नेत्याचं मनोज जरांगे यांना आवाहन
Maratha Reservation: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा आज शेवटचा दिवस.
नाशिक: मराठा आरक्षणाचा मोठा पेच निर्माण झाला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा आज शेवटचा दिवस आहे. आरक्षणाची घोषणा न झाल्यास पुन्हा उपोषण करण्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. एक घंटा देखील वाढवून देणार नाही. तर २५ ऑक्टोबर पासून कडक आमरण उपोषण सुरु होणार आहे. नेत्यांनी आमच्या गावात यायचं नाही. आम्ही तुमच्याकडे येत नाही. तुम्ही आमच्याकडे यायचं नाही हे सर्व आंदोलन शांततेत होणार आहे असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहे. यावर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे, आरक्षण देईल तर हेच सरकार देईल. फक्त त्यासाठी थोडा वेळ लागेल, असं गिरीश महाजन म्हणालेत. नाशिकमध्ये ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा समाजाला आश्वासन दिलं आहे.
मनोज जरांगे यांनी चाळीस दिवसांची मुदत दिली होती. आम्ही न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली समितीचे वेगाने काम सुरु केलं आहे. मला वाटतं, त्यांनी आम्हाला थोडा वेळ द्यावा. कायदेशीर आणि टिकणारं आरक्षण देण्यासाठी कायदेशीर आधार द्यावा लागेल. अजूनही थोडा वेळ लागेल, असं मला वाटतंय.चर्चा ही सुरू राहिली पाहिजे, चर्चेतून मार्ग निघेल. पुन्हा उपोषणाला बसून, शरीराला ताण देऊन फार काही उपयुक्तता होणार नाही, असंही गिरीश महाजन म्हणालेत.
सरसकट आरक्षणाची काही आवश्यकता नाही. पण मराठवाड्यात त्याची आवश्यकता आहे. त्यासाठी समिती अभ्यास करत आहे. अजून किती दिवस लागेल, हे मला सांगता येणार नाही. आमच्या सरकारवर लोकांचा विश्वास आहे. त्याचमुळे आमच्या सरकारच्या काळात मोर्चे निघत आहेत. सरकार त्याची दखल घेत आहे. पण याबाबतीत तोडगा काढायला थोडा वेळ लागेल, असं गिरीश महाजन म्हणाले.
मराठा आरक्षण मिळत नाही. तोवर नेत्यांना गावात येऊ देणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. यावर यातून लवकरच मार्ग निघेल. फार काही बंदी वगैरे याची गरज पडणार नाही, असंही महाजन म्हणालेत.
Web Title: Maratha reservation is to be given by our own government, just give it some time BJP
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App