Home Accident News भरधाव कार-कंटेनरचा भीषण अपघात, भाजप नगरसेवकासह चौघांचा जागीच मृत्यू

भरधाव कार-कंटेनरचा भीषण अपघात, भाजप नगरसेवकासह चौघांचा जागीच मृत्यू

Nashik Car Accident: चांदवड येथे भीषण अपघात, कारमधील चार जण ठार, एका भाजप नगरसेवकाचा मृत्यू.

accident of speeding car-container, 4 including BJP corporator died on the spot

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे कार-कंटेनरच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये भाजप नगरसेवकाचा समावेश आहे. सकाळी सात वाजेच्या सुमारास चांदवड जवळ असलेल्या नमोकार तीर्थक्षेत्रा समोरील मुंबई-आग्रा महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील चार ठार जण जागीच ठार झाले आहेत. या अपघातातील मयत हे नाशिककडून धुळे येथे चालले होते.

अपघातातील मयत हे धुळे जिल्ह्यातील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. किरण हरीचंद्र अहिरराव, अनिल विष्णू पाटील, कृष्णकांत चिंधा माळी, प्रवीण मधुकर पवार मृत व्यक्तींचे नावे आहेत.

या भीषण अपघातात धुळ्यातील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक असलेले किरण अहिरराव (प्रभाग क्र.७) आणि त्यांच्या मित्रांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलीस व सोमा टोलवेज कंपनीचे अपघातग्रस्त पथक घटनास्थळी पोहचले. या अपघातानंतर काही वेळ महामार्ग ठप्प झाला होता.

Web Title: accident of speeding car-container, 4 including BJP corporator died on the spot

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here