अहमदनगर धक्कादायक घटना: पतीने केली पत्नी व सासुची हत्या
Ahmednagar News: कौटुंबिक वादातून पतीने पत्नी आणि सासूची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना.
राहुरी: अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कात्रड येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नी आणि सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. कात्रड गावामधे रात्री ११ वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.
पत्नी नूतन सागर साबळे (वय 23 वर्षे) तर सासु सुरेखा दिलीप दांगट (वय 45 वर्षे) अशी मृत व्यक्तींचे नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, सागर सुरेश साबळे याने आपल्या राहत्या (सासुरवाडीतील) घरात पत्नी आणि सासू झोपेत असतानाच डोक्यावर लोखंडी वस्तूने प्रहार करून ही हत्या केली असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.
मुलीला बहिणीकडे सोडण्यासाठी आलेल्या मयत नूतन यांच्या भावाला ही धक्कादायक घटना निदर्शनास आली. दोन्ही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहिल्यानंतर घटनेची माहिती भावाने राहुरी पोलिसांना दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक धनंजय जाधव, सहायक पोलीस निरीक्षक राजु लोखंडे, पोलीस उप निरीक्षक खोंडे हे तात्काळ पोलीस पथकासह घटनास्थळी पोहचले. आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली आहेत.
Web Title: Husband Murder his wife and mother-in-law
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App