Home अहमदनगर नगरमधील ‘मर्डर’ विधीमंडळात, थोरातांचा  सवाल…गुन्हेगारांना सत्ताधार्‍यांचा…..

नगरमधील ‘मर्डर’ विधीमंडळात, थोरातांचा  सवाल…गुन्हेगारांना सत्ताधार्‍यांचा…..

Ahmednagar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंकुश चत्तर या पदाधिकार्‍याची हत्या (Murder), गुंड टोळीवर कडक कारवाईची मागणी.

'Murder' in the city, Thorat question in the Legislature

अहमदनगर: अहमदनगर येथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंकुश चत्तर हत्याकांडावरून काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी संताप व्यक्त करत गुंड टोळीवर कडक कारवाईची मागणी केली. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला उत्तर देताना गुन्हेगारांवर जात, धर्म आणि पक्ष न पाळता कडक कारवाई केली जाईल, असे सांगितले.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंकुश चत्तर यांच्यावर शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारात सावेडी उपनगरातील एकविरा चौक परिसरात प्राणघातक हल्ला झाला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात भाजपचा नगरसेवक सराईत गुन्हेगार स्वप्निल शिंदेसह 6 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. हत्याकांडाच्या या घटनेमुळे नगर शहराच्या सावेडी परिसरात दहशत पसरली आहे. शहरात वाढलेली गुन्हेगारी आणि या गुन्हागारीला मिळणार्‍या राजकीय पाठबळामुळे लोकभावना तीव्र आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी हा मुद्दा आज अधिवेशनादरम्यान सभागृहात उपस्थित केला.

थोरात म्हणाले, नगरमध्ये अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंकुश चत्तर या पदाधिकार्‍याची हत्या करण्यात आली. हे हत्याकांड सत्ताधारी भाजपसंबंधित असलेल्या दहा जणांनी केले. नगरमध्ये खासदार, आमदार सत्ताधारी पक्षाचेच आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना सत्ताधार्‍यांचा आधार मिळतो की काय अशी भावना लोकांची झालेली आहे. परिणामी नगर जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगाराला जात नसते, धर्म नसतो आणि पक्षसुद्धा नसतो, हे सत्ताधार्‍यांच्या तोंडून ऐकायचे आहे. चत्तर यांच्या हत्याकांडातील सर्व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करावेत. थोरात यांनी उपस्थित केलेला अहमदनगरमधील गुन्हेगारीच्या मुद्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. त्यांनी योग्य कारवाईबाबत थोरात यांना आश्वस्त केले. फडणवीस म्हणाले, गुन्हेगाराला जात, धर्म आणि पक्ष न पाळता त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.

Web Title: ‘Murder’ in the City, Thorat question in the Legislature

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here