Home अकोले अकोले: मुसळधार पावसामुळे सांदण दरीमध्ये अडकले ५०० पर्यटक, वनविभागाच्या मदतीने….

अकोले: मुसळधार पावसामुळे सांदण दरीमध्ये अडकले ५०० पर्यटक, वनविभागाच्या मदतीने….

Akole News:  अचानक आलेल्या वादळी वारा व मुसळधार पावसामुळे ( heavy rain) भंडारदरा धरण परिसरातील आशिया खंडातील दोन नंबरची खोल दरी असलेल्या सांदण दरीमध्ये अडकलेल्या सुमारे 500 पर्यटकांना वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी स्थानिक नागरिक व गाईड यांच्या मदतीने सुखरुप बाहेर काढण्यात यश आले.

500 tourists got stuck in Sandan Valley due to heavy rain

अकोले: रविवार दिनांक 4 जून रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वारा व मुसळधार पावसामुळे भंडारदरा धरण परिसरातील आशिया खंडातील दोन नंबरची खोल दरी असलेल्या सांदण दरीमध्ये अडकलेल्या सुमारे 500 पर्यटकांना वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी स्थानिक नागरिक व गाईड यांच्या मदतीने सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.

शनिवार, रविवार सुट्टी व भंडारदरा धरण परिसरात सुरु असलेला काजवा महोत्सवाचा आनंद उपभोगण्यासाठी सध्या तोबा गर्दी होत असुन परिसरात जत्रेचे स्वरुप निर्माण झाले असुन जिकडेतिकडे पर्यटकांच्या वाहनांची रुग्णालय लागलेली पाहावयास मिळत आहे. यातील काही पर्यटकांनी शनिवारी रात्री काजवा महोत्सवाचा मनमुराद आस्वाद घेऊन रविवारी दुपारी आशिया खंडातील दोन नंबरची खोल दरी असलेल्या सांदण दरीचा आनंद घेण्यासाठी दरीमध्ये उतरले व अचानक वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली व पाण्याचा ओघ वाढु लागला.

त्याच दरम्यान तेथे गस्तीवर असलेले वन विभागाचे वनरक्षक महिंद्रा पाटील, गुलाब दिवे, वनमजुर दशरथ बांडे यांना माहिती मिळाली की सुमारे 500 ते 600 पर्यटक सांधण दरी अडकले आहेत त्यांनी तात्काळ मदत कार्यासाठी धाव घेत स्थानिक नागरिक व गाईड यांच्या मदतीने अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले.

दरम्यान, कळसपासून भंडारदर्‍याच्या पाणलोट क्षेत्रातील घाटघर-साम्रद पर्यंत काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला. दुपारी अचानक आलेल्या जोरदार वादळामूळे लोक अक्षरशः घाबरुन गेले.मृगापुर्वीच्या रोहिणी नक्षत्रात प्रथमच पावसाळी वातावरण तयार झाले होते.वारा जोरदार घोंघावला,मोठमोठी झाडेही उन्मळून पडतील अशी परिस्थिती काही वेळ तयार झाली. वादळात किरकोळ शिडकावा झाला आणि काही वेळातच आकाशात ढग गायब होऊन लख्ख सुर्यप्रकाशाने आग ओकायला सुरुवात केली. काही काळ वादळ आणि गडगडाटाने मात्र लोकांची चांगलीच धांदल उडविली होती.

Web Title: 500 tourists got stuck in Sandan Valley due to heavy rain

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here