Home क्राईम नाशिक हादरलं! इंस्टाग्रामवर सूत जुळलं, मात्र दहावीच्या निकालाच्या आदल्या दिवशी तिच्यासोबत…

नाशिक हादरलं! इंस्टाग्रामवर सूत जुळलं, मात्र दहावीच्या निकालाच्या आदल्या दिवशी तिच्यासोबत…

Nashik Crime: 16 वर्षीय मुलीच्या खुनाची  (Murder) घटना, मुलीच्या आई-वडिलांच्या तक्रारीनुसार सदर मुलीच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल.

murder of 16-year-old girl, as per the complaint of the parents of the girl, a case against the boyfriend

नाशिक: नाशिकमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. सिडको भागातील इंदिरानगर परिसरात 16 वर्षीय मुलीच्या खुनाची घटना घडली आहे. मुलीच्या आई-वडिलांच्या तक्रारीनुसार सदर मुलीच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान ही 16 वर्षीय मुलगी संशयित विनायक जाधव यांच्यात प्रेमप्रकरण असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोघांमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून संपर्क होता. सुरवातीला या दोघांची सोशल मीडियावर ओळख झाली. हळूहळू दोघांमध्ये चॅटिंग वाढली. यानंतर दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं. जवळपास सहा महिने संपर्कात राहिल्यानंतर काही कारणास्तव वाद झाल्याने दोघांमध्ये बिनसले. त्यानंतर गुरुवारी ही मुलगी इमारतीवरून कोसळल्याने तिचा मृत्यू झाला. यानंतर सदर मुलीच्या मोबाईल तपासणी केली असता पोलिसांना संबंधित विनायक यास ब्लॉक केल्याचे दिसून आले. त्यावरून त्याचा तपास करून त्यास घोटी येथून ताब्यात घेण्यात आले आहे. खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस करीत आहे. इंदिरानगर पोलिसांच्या अधिक तपासानंतर मुख्य कारण समोर येणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Web Title: murder of 16-year-old girl, as per the complaint of the parents of the girl, a case against the boyfriend

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here