अहमदनगर: मानवी तस्करीचे रॅकेट उघड, लोकांना डांबून ठेवून भिक मागण्यास
Ahmednagar News: श्रीगोंदा तालुक्यातील प्रकार: चौघा वेठबिगार मजुरांची सुटका. (Exposing human trafficking rackets)
अहमदनगर | Shrigonda : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीत कार्यरत असलेल्या टोळ्या या मानवी तस्करी करून लोकांना डांबून ठेवून, मारहाण करत वेठबिगारी करून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे श्रीगोंदा तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं असून चौघांची सुटका करण्यात आली आहे.
ढवळगाव (ता. श्रीगोंदा) शिवारात एका विहिरीतील बेवारस मृतदेहाचा तपास करताना श्रीगोंदा तालुक्यातील मानवी तस्करीचे रॅकेट उघड झाले. याप्रकरणी बेलवंडी पोलिसांनी गुरुवारी (दि.४) तिघांना बेड्या ठोकल्या असून चौघा वेठबिगार मजुरांची सुटका केली आहे.
दोन दिवसांपूर्वी ढवळगाव येथे अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने बेलवंडी पोलिसांनी चौकशी सुरू केली. चौकशीअंती खबऱ्यांमार्फत पोलिसांना बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मानवी तस्करी करून काही परप्रांतीय मजुरांना वेठबिगार म्हणून विक्री केली जात असल्याचे समजले. काहींना रेल्वे स्टेशनवर भीक मागायला लावले जात असल्याचेही समजले. त्यानुसार बेलवंडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांनी तीन पथके तयार करून चौकशी केली.
त्यांना खरातवाडी येथील शेंडगे वस्ती शिवारात पिलाजी कैलास भोसले यांच्याकडे सलमान ऊर्फ करण कुमार हा छत्तीसगड येथी वेठबिगार मजूर आढळून आला. घोटवी येथील बोरुडे मळा येथे अमोल गिरीराज भोसले यांच्याकडे ललन सुखदेव चोपला हा बिहार येथील मजूर आढळून आला. तसेच घोटवी येथील अशोक दाऊद भोसले व जंग्या गफुर काळे यांच्याकडे भाऊ हरिभाऊ मोरे (रा. चोनई, ता. आंबेजोगाई, जि. बीड) हा वेठबिगार मजूर आढळून आला. तसेच अधिक चौकशी केली असता मोरे याने कर्नाटकातील एका कामगाराची पाच हजार रुपयास विक्री केल्याचे समजले. तो मजूर सुरोडी येथील मारुती गुलाब चव्हाण यांच्याकडे आढळून आला. बेलवंडी पोलिसांनी चौघा वेठबिगार कामगारांची सुटका करून तिघा कारवाई केली.
पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, उपनिरीक्षक राजेंद्र चाटे, सहायक उपनिरीक्षक रावसाहेब शिंदे, मारुती कोळपे, अजिनाथ खेडकर, ज्ञानेश्वर पठारे, भाऊ शिंदे, शरद कदम, शरद गांगर्डे, नंदू पठारे, संतोष धांडे, विनोद पवार, कैलास शिवलकर, संदीप दिवटे, सतीश शिंदे, सचिन पठारे, सुरेखा वलवे, सोनवणे यांनी ही कारवाई केली.
Web Title: Exposing human trafficking rackets, keeping people waiting and begging
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App