आपल्या जीवनाचा शिल्पकार असलेला एक शिक्षक: विश्वासराव आरोटे
अकोले: अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य, तसेच आदिवासी भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शिक्षकांनी देखील आपण ज्या क्षेत्रात काम करत आहोत तो विद्यार्थी उद्याचा आदर्श भारताचा नागरिक कसा घडवता येईल त्याला त्याच्या पायावर उभे करून शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे तो घेणाऱ्या गुरगुरलाच पाहिजे या उक्तीप्रमाणे तालुक्यातील माजी मंत्री मधुकरराव पिचड व आमदार वैभव पिचड ,एम एम भवारी सर यांच्या नेतृत्त्वाखाली सुरू असलेल्या आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयातील गुणवंत शिक्षक नेहमी उपक्रमशील राज्यात नव्हे तर देशांमध्ये या शिक्षकाने विद्यार्थ्यांना गणित भूमिती या विषयात साध्या व सोप्या पद्धतीने हजारो विद्यार्थी आपल्या विषयात गुण मिळवून गुण मिळवत अनेक विद्यार्थी राज्याच्या विविध क्षेत्रात उच्चपदस्थ पत्रकार शिक्षक या क्षेत्रात काम करीत असून देखील सरांनी कधीही आपल्या शिकवणीतून विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष न करता आजही प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात प्रमेय उपक्रम कसे साध्या व सोप्या पद्धतीने सोडवता येतील यासाठी सरांची विद्यार्थ्यांकडे असलेली कटाक्ष नजर वर्षानुवर्ष विद्यार्थी विविध क्षेत्रात गेले तरी ज्या शिक्षकाने गणित-भूमिती विषयात 150 मार्गांपैकी नेहमी प्रत्येक बॅचेस मध्ये 130 135 या सरासरी मध्ये शंभर टक्के निकालाची परंपरा आपल्या विषयात लावताना दिसून आली कधीही मनात अहंकार नाही अत्यंत संयमी गर्व नाही साध्या-सोप्या भेटल्यानंतर आपल्या स्मितहास्याने विद्यार्थी असून देखील माझा विद्यार्थी देशाच्या नव्हे तर जागतिक पातळीवर जाऊन त्यांनी त्याचे नाव त्याच्या क्षेत्रात कोरले तर मला माझ्या मुलांपेक्षाही माझा विद्यार्थी सांगण्यात मला आनंद वाटतो प्रत्येक शिक्षकाने हवेत न जाता आपण जमिनीवर राहून शासनाने आपल्याला जी नेमणूक केली ती विद्यार्थी घडविण्यासाठी त्यामुळे शालेय बाहेर काम न करता शालेय कामकाजात दिलेल्या वेळेनुसार शाळेत हजर राहून येणारा विद्यार्थी हा उद्याचा आदर्श भारताचा नागरिक कसा बनू शकतो यासाठी मनापासून प्रेम केले तर नक्कीच विद्यार्थीदेखील त्याच्या यशामध्ये आपला खारीचा वाटा विसरू शकत नाही ही माझ्या माझ्या विद्यालयातील विद्यार्थी देशाच्याच नव्हे तर जगाच्या पटलावर गेला तर तो एक दिवस ज्या शाळेत आपण शिक्षण घेतले त्या शाळेत मिळालेल्या शिक्षणाचा पुनरुच्चार हादेखील इतर ठिकाणी करू शकतो जसा कुंभार मातीला आकार देऊन मडके घडवितो त्यामध्ये त्याला जो आनंद मिळतो तो आनंद पैशापेक्षा त्याच्या कलाकृतीला व त्याला सुभकता आणण्यामध्ये असतो तसा प्रत्येक विद्यार्थ्याला घडविताना त्याची वेळोवेळी दखल वेळोवेळी समाज व त्याच्या कलानुसार आपण त्याला घडवण्यासाठी प्रयत्न केले तर नक्कीच तो विद्यार्थी देखील आपल्या शिक्षण क्षेत्रात त्या शिक्षकाविषयी आपल्या हृदयात वेगळे स्थान निर्माण करू शकतो असा हा मोठ्या मनाचा दिलदार शिक्षक अत्यंत संयमी विनम्रता नेहमी हसतमुख आपल्या स्मित हास्याने प्रत्येक विद्यार्थ्याला दैनंदित प्रत्येक तासाला मन प्रसन्न असा फुलोरा फिरवणारा गुणवंत शिक्षक जेव्हा जेव्हा या विद्यार्थ्याला भेटतो तेव्हा त्या विद्यार्थ्याला त्या शिक्षकाविषयी असलेले तलमता ही त्या काळात त्या शिक्षकाने त्या विद्यार्थ्याला घडविताना जो मनाचा मोठेपणा शिस्त राग आग व वेळ प्रसंगी त्याला वठणीवर आणण्यासाठी दिलेला मार ही त्याच्या कामाची ओळख असली तरीही हजारो विद्यार्थ्यांना घडविणारा असा इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयातील लाखो विद्यार्थ्यांचा गुणवंत शिक्षक कैलास गेनुजी तेलोरे सर आज अचानक जेव्हा माझ्या कार्यालयात आले तेव्हा काही क्षण सर आपण आलात मागील आठवणींना उजाळा देताना तेव्हाचे चेहऱ्यावरील स्मित हास्य आजही ते स्मितहास्य सांगत होते की आपण कितीही मोठे झालो तरीही शिक्षक हा आपल्या जीवनाचा शिल्पकार असून त्याच्या आशीर्वादाने व भावी काळातील आशीर्वादाने आपल्या जीवनात एक वेगळा मार्ग दाखविला अशा या माझ्या गुणवंत शिक्षकास लाख लाख शुभेच्छा.
विश्वासराव आरोटे (महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ सरचिटणीस)
Website Title: Latest News Viswasrao Arote A teacher who is the sculptor

















































