शिर्डीतील ‘त्या’ तरुणीच्या हत्येचे धक्कादायक गूढ उघडकीस, शिर्डीत खळबळ
Shirdi News: एका भावानेच आपल्या बहिणीची डोक्यात सिमेंटचा पेव्हर ब्लॉक घालून निर्घृण हत्या (Murder) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
शिर्डी: शिर्डीत ऑनर किलिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका भावानेच आपल्या बहिणीची डोक्यात सिमेंटचा पेव्हर ब्लॉक घालून निर्घृण हत्या केली आहे. बहिणीचे प्रेमसंबंध असल्याने भावाला राग अनावर झाल्याने भावाने सख्ख्या बहिणीची हत्या केल्याने शिर्डीत खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आपल्या बहिणीचे प्रेमसंबंध समजल्यावर भाऊ आणि तिच्यात बराच वाद झाला. या वादाचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले. राग अनावर झाल्याने निर्दयी भावाने आपल्या सख्ख्या बहिणीच्या डोक्यात थेट सिमेंटचा पेव्हर ब्लॉक टाकला. यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला.
मंगळवारी रात्रीच्या सुमारास धक्कादायक घटना घडली असून अल्पवयीन आरोपीस येवला आणि शिर्डी पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतलं. शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ करत आहेत.
Web Title: shocking mystery of the murder of ‘that’ young woman in Shirdi is revealed
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App