Home क्राईम संगमनेर: टेम्पोची दुचाकींना धडक; तरुणांचा मृत्यू, तिघे जखमी

संगमनेर: टेम्पोची दुचाकींना धडक; तरुणांचा मृत्यू, तिघे जखमी

Sangamner News:  आयशर टेम्पोने दोन दुचाकींना पाठीमागून धडक दिल्याने अपघात (Accident).  दुचाकीहून प्रवास करणाऱ्या युवकाचा मृत्यू झाला, तर दुचाकीहून प्रवास करणारे तिघे जखमी.

Sangamner Accident tempo hit the bike Youth killed, three injured

संगमनेर: आयशर टेम्पोने दोन दुचाकींना पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला. नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात (तळेवाडी फाटा) रविवारी (दि. १) सकाळी ११ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये दुचाकीहून प्रवास करणाऱ्या युवकाचा मृत्यू झाला, तर दुचाकीहून प्रवास करणारे तिघे जखमी झाले.

शुभम फटांगरे आणि त्याचे वडील दादाभाऊ फटांगरे, अमोल नालकर आणि माहेश्वरी आगरे हे संगमनेरच्या दिशेने येते होते. त्यावेळी चंदनापुरी घाटात (तळेवाडी फाटा) पाठीमागून भरधाव येणाऱ्या आयशर टेम्पोची (एम. एच. ४७, ए. एस. २७६१) ते प्रवास करीत असलेल्या दोन्ही दुचाकींना पाठीमागून धडक बसली. अपघातानंतर टेम्पो महामार्गावर उलटून मोठा आवाज झाला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. जखमींना रुग्णवाहिकेतून उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक रक्तस्त्राव होऊन शुभम फटांगरे यांचा मृत्यू झाला.

शुभम दादाभाऊ फटांगरे (वय २२, रा. पोखरी बाळेश्वर) असे अपघातातील मयत युवकाचे नाव आहे. दादाभाऊ भाऊसाहेब फटांगरे (रा. पोखरी बाळेश्वर, ता. संगमनेर), अमोल रामनाथ नालकर (रा. रामपूर, ता. राहुरी) व माहेश्वरी बाळासाहेब आगरे (रा. एकरूखे, ता. राहाता) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, घारगाव पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार ए. आर. गांधले यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

क्रेनच्या साहाय्याने आयशर टेम्पो बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. याप्रकरणी भारत फटांगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Sangamner Accident tempo hit the bike Youth killed, three injured

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here