धक्कादायक! पोलीस चौकीत संशयित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
अहमदनगर येथून ताब्यात घेतलेल्या एका महिलेने चौकीच्या स्वच्छतागृहात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. निगडीतील ओटास्कीम पोलीस चौकीत एक धक्कादायक घटना घडली आहे.
पिंपरी : एका प्रकरणात संशयीत असलेल्या महिलेला निगीडी पोलिसांनी अहमदनगर येथून अटक केली होती. निगडीतील ओटास्कीम पोलीस चौकीतील तिला ठेवण्यात आले होते. दरम्यान, या महिलेने चौकीच्या स्वच्छतागृहात जात स्वेटरच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली.
निगडी पोलीस ठाण्यात १२ एप्रिल रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास करत असताना निगडी पोलिसांनी एका २९ वर्षीय संशयित महिलेला अहमदनगर येथून अटक केली होती. तिच्याकडे चौकशी सुरू असताना तिने पोलीस चौकीतील बाथरूम मध्ये जात लोखंडी ग्रीलला स्वेटरच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली. यावेळी बाथरूम बाहेर महिला पोलीस कर्मचारी देखल होत्या.
आरोपी महिला बराच वेळ बाहेर न आल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत पाहिले असता संबंधित महिलेने गळफास घेतल्याचे समोर आले. या घटनेमुळे पोलिसांची धावळप उडाली. महिलेला दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, तिचा आधीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) केला जाणार आहे.
Web Title: suspected woman committed suicide by hanging herself at the police post
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App