Home संगमनेर संगमनेर: चराच्या पाण्यात बुडून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे हकनाक बळी

संगमनेर: चराच्या पाण्यात बुडून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे हकनाक बळी

Sangamner News: तालुक्यातील निळवंडे येथे जलजीवन मिशन अंतर्गत खोदकाम सुरू आहे. खोदलेल्या चारीतील पाण्यात पडून  (drowning) वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना.

Unfortunate death of toddler by drowning

संगमनेर:  स्थानिक प्रशासन व ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे या मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. मधुमाला शाम साळुंके या अवघ्या 7 वर्षीय चिमुकलीचा हकनाक बळी गेला आहे.  जलजीवन मिशनच्या कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराचा हलगर्जीपणा एका बालिकेच्या जीवावर बेतला. संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे जलजीवन मिशन अंतर्गत खोदकाम सुरू आहे. खोदलेल्या चारीतील पाण्यात पडून वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला आहे. मधुबाला शाम साळुंखे असे या दुर्दैवी बालिकेचे नाव आहे.

दि 14/04/2023 रोजी दुपारी 4.00 वा चे सुमारास निळवंडे गावच्या जिल्हा परीषद शाळेजवळ असलेल्या मधुबाला ही जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याचे पाण्याची पाईप लाईनचे खोदकाम चालु आहे. तेथे जुनी पाईप लाईन फुटुन त्याचे पाणी चरामध्ये आलेले आहे. त्या साचलेल्या चराच्या पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

जलजीवन मिशनचे निळवंडे येथे काम सुरू असून यासाठी संबंधित ठेकेदाराने चारी खोदून ठेवली आहे. खोदलेल्या चारीमध्ये पाण्याची पाईपलाईन लिकेज झाल्याने चारीत मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले होते. याकडे संबंधित ठेकेदाराने लक्ष न दिल्याने या चारीमध्ये असलेल्या पाण्यात मधुबाला श्याम साळुंखे ही बालिका पडली. चारीतील पाण्यात ती बुडाली.

ग्रामस्थांनी तिला तातडीने घुलेवाडी संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकारामुळे निळवंडे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत असून प्रशासन संबंधित ठेकेदारावर काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.

तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या अकस्मात मृत्यूप्रकरणी पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एल. एम. ओटी करत आहेत.

Web Title: Unfortunate death of toddler by Drowning

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here