आनंदाची बातमी! मान्सूनच्या आगमनाची तारीख आली, या दिवशी मुंबईत…..
Monsoon 2023 News: सलग पाचव्या वर्षी देशामध्ये सामान्य पाऊस पडणार असल्याचा अंदाज, देशामध्ये सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता.
दिल्ली: देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान खात्याने (Monsoon 2023) सलग पाचव्या वर्षी देशामध्ये सामान्य पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. केवळ शेतकऱ्यांसाठी नाही तर सामान्य जनतेसाठी देखील ही खूपच आनंदाची बातमी आहे.
मान्सूनच्या मध्यभागी मध्यम एल निनो येण्याचा धोका असला तरी देशामध्ये सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे, हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, मान्सूनच्या चार महिन्यांमध्ये म्हणजेच जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये ८७ सेंटीमीटर पाऊस पडतो. हा आकडा 1971 -2020 च्या आकड्यांवर आधारित आहे. यावर्षी 87 सेंटीमीटरचा ९६ टक्के म्हणजे ८३.५ सेंटीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस सामान्य पावसाप्रमाणेच आहे. सध्या देशामध्ये ६० टक्के शेती ही पावसावर अवलंबून आहे.
हवामान खात्याने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतामध्ये २०१९ मध्ये मान्सून दरम्यान ९७१.८ मिमी पाऊस पडला. २०२० मध्ये ९६१.४ मिमी, २०२१ मध्ये ८७४.५ मिमी आणि २०२२ मध्ये ९२४.८ मिमी पाऊस पडला होता. दरम्यान, एल नीनोमुळे दक्षिण अमेरिकेजवळील प्रशांत महासागरातील विषुववृत्ताभोवती सामान्य तापमानापेक्षा जास्त उष्ण तापमान असते. हे मान्सूनचे वारे कमकुवत होण्याशी आणि भारतात कमी पाऊस पडण्याशी संबंधित आहे.
देशामध्ये मान्सूनचे आगमन होण्याची सामान्य तारीख ही एक जून आहे. मान्सून सर्वात आधी केरळमध्ये दाखल होते. त्यानंतर तो हळूहळू पुढे सरकरत देशभरातील इतर भागामध्ये दाखल होतो
मान्सूनच्या आगमनाच्या तारखा (India Monsoon 2023):
केरळ – १ जून
चेन्नई – ४ जून
मुंबई – ११ जून
रायपूर – १६ जून
वाराणसी – २० जून
आगरा – ३० जून
दिल्ली – २७ जून
चंदीगड – २६ जून
लडाख – २३ जून
Web Title: Monsoon 2023 News Alert
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App