नगर जिल्ह्यात या दिवशी पडणार पाऊस- पंजाबराव डख अंदाज
Ahmednagar Rain Alert: २८ जूनला खरिपाची पेरणी करावी, असे आवाहन हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख (Panjabrao Dakh).
पारनेर : नगर जिल्ह्यासह राज्यात ६, ७, ८, १६, १७, १८ एप्रिलला पाऊस होणार आहे. राज्यात ८ जूनलाच मान्सूनचे आगमन होणार असून, २२ जूनला राज्यात सर्वदूर पाऊस होणार आहे. शेतकऱ्यांनी २८ जूनला खरिपाची पेरणी करावी, असे आवाहन हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी केले. निघोज (ता. पारनेर) येथे रामनवमी उत्सवानिमित्त डख यांचे शेतकऱ्यांसाठी शुक्रवारी रात्री व्याख्यान झाले. डख म्हणाले की, निसर्गावर आधारित नाही तर हवामानावर आधारित शेती करा. त्यामुळे शेतमालाचे नुकसान होणार नाही. आपल्या शेतातील गावरान आंब्याचे झाड एक वर्षाच्या पावसाचा अंदाज देते. यासाठी निसर्गाचा अभ्यास करण्याचा सल्ला डख यांनी दिला.
शेतकऱ्यांबाबत सरकारही उदासीन आहे. कोरोनाच्या काळात देशातील व राज्यातील सर्व कंपन्या बंद होत्या. फक्त शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय सुरू होता. राज्यात ४२ हजार २६० गावे असून, सर्व गावांमधील हवामानाच अचूक अंदाज सांगू शकतो. त्यामुळे गमतीचा भाग असा की, काही शेतकरी माझ्याकडे खासगी प्रश्न घेऊन येतात. मात्र, त्यातील फक्त पावसासंदर्भातील प्रश्नांची उत्तरे देतो. पावसाचा अंदाज आल्यास शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान होऊ नये, यासाठी वेळप्रसंगी रात्री एक वाजता भ्रमणध्वनीवर दहा लाख शेतकऱ्यांना हवामान व पावसाचा अंदाज पाठवून सावध करतो, असे त्यांनी सांगितले.
Web Title: Rain will fall on this day in Nagar District Punjabrao Dakh forecast
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App