Home महाराष्ट्र ठाकरे गटाला मोठा धक्का! शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव!

ठाकरे गटाला मोठा धक्का! शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव!

ANI News Eknath Shinde: The Election Commission of India today ordered that the party name “Shiv Sena” and the party symbol “Bow and Arrow” will be retained by the Eknath Shinde faction.

Eknath Shinde Shiv Sena and the party symbol Bow and Arrow

Eknath Shinde: राजकीय सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. हा निर्णय ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे.

आठ महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह बंडखोरी केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता. यानंतर मागील आठ महिन्यांपासून निवडणूक आयोगात सुनावणी सुरु होती. ही सुनावणी आता पूर्ण झाली असून बहुमताचा आधारावर हा निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयाचे शिंदे गटाकडून स्वागत केले जात आहे. तर या निर्णयाविरोधात कायदेशीर लढाई लढण्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत.

खरी शिवसेना कोणाची तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाचे याबाबत निवडणूक आयोगाने दोन्ही ठाकरे तसेच शिंदे गटाला आपापली बाजू मांडण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी दोन्ही गटांना पदाधिकारी तसेच पक्षातील अन्य महत्त्वाच्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचे सिद्ध करा, असेही निवडणूक आयोगाने सांगितले दिले होते. त्यानंतर दोन्ही गटाने पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा असलेली कागदपत्रं निवडणूक आयोगासमोर सादर केले होते.

दरम्यान, या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “लोकशाहीला बहुमताला महत्त्व असते. आज आपण पाहिले राज्यात बहुमताचे सरकार स्थापन झाले आहे. हा बहुमताचा विजय आहे. लोकशाहीचा विजय आहे. मी पुन्हा एकदा सांगतो बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा विजय आहे,” असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

Web Title: Eknath Shinde Shiv Sena and the party symbol Bow and Arrow

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here