समृद्धी महामार्गावर कारला भीषण अपघात, कठडे तोडून कार पुलावरून….
Ahmednagar Samruddhi Highway Accident: कारच्या अपघातात पुलाचे कठडे तुटले असून सदर कार पुलावरून कोसळतांना बालंबाल वाचली.
शिर्डी: समृद्धी महामार्गावर एका कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघात कारचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजजवळ सकाळी साडे अकरा ते बाराच्या सुमारास एका कार औरंगाबाद वरून शिर्डीकडे येत असताना शिर्डी इंटरचेंजआधी दोन्ही पुलाच्या मधोमध धडकली. या अपघातामध्ये पुलाचे कठडे तुटले असून सदर कार पुलावरून कोसळतांना बालंबाल वाचली आहे.
मात्र या दरम्यान एअर बॅग उघडल्याने चालक बचावला आहे. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कारचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्ष दर्शीनी सांगितले. या अपघातानंतर बचाव पथक अपघात स्थळी दाखल झाले व जखमीला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात हलवले. अपघाताच्या मालिका सुरु असल्याने समृद्धी महामार्ग चर्चेत आला आहे.
Web Title: Shirdi car accident on Samriddhi highway
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App