संगमनेर: उसाचा ट्रॅक्टर आणि कारचा अपघात, कारमधील तिघे जण…
Sangamner Accident News: उसाच्या ट्रॅक्टरने अचानक वळण घेतल्यामुळे कार ट्रॅक्टरवर आदळल्याने भीषण अपघात.
संगमनेर: पुणे-नाशिक महामार्गावरील राजापूर शिवारात असलेल्या कृष्णा लॉन्सजवळ मधोमध चाललेल्या उसाच्या ट्रॅक्टरने अचानक वळण घेतल्यामुळे कार ट्रॅक्टरवर आदळल्याने भीषण अपघात झाला. ट्रॅक्टरमध्ये कार अडकल्याने ट्रॅक्टरबरोबर कार फरपटत गेली. या अपघातात कारमधील तीन जण गंभीर जखमी झाले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर उसाचा ट्रॅक्टर नाशिक दिशेच्या जात होता. सदरचा ट्रॅक्टर राजापूर शिवारातील कृष्णा लॉन्सजवळ आला असता चालकाने अचानक वळण घेतले. याचवेळी या ट्रॅक्टरच्या पाठीमागून कार येत होती. ट्रॅक्टरने अचानक वळण घेतल्याने कार चालकाचा गोंधळ उडाला. ट्रॅक्टर चालकाला वळायचे असे समजून कारवरील चालकाने दुसर्या बाजूने आपले वाहन पुढे नेले. परंतु ट्रॅक्टवर चालकाने पुन्हा आपली दिशा बदलीत सरळ दिशेने घेतले. त्यामुळे दुभाजक आणि ट्रॅक्टर यांच्यामध्ये कार दबली. ट्रॅक्टरवरील चालकाला ही घटना लक्षात आली नाही. त्यामुळे कार ट्रॅक्टरसमवेत फरफटत नेली.
Web Title: Sugarcane tractor and car accident three injured
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App