सत्यजीत तांबे काँग्रेस की भाजपाला पाठिंबा देणार? सुधीर तांबे यांचं सूचक विधान
Nashik Graduate Constituency Election, Satyajeet Tambe: सत्यजीतवर विश्वास दाखवत आमच्या परिवारावही विश्वास टाकला .
नाशिक: मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निकाल गुरुवारी ( २ जानेवारी ) जाहीर झाला. नाशिक पदवीधर मतदासंघाच्या निवडणुकीत उमेदवारीवरून सत्यजीत तांबे आणि काँग्रेसमध्ये मतभेद झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तर, महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना उमेदवारी दिली होती. तिन्ही पक्षांचा पाठिंबा असताना सत्यजीत तांबेंनी शुभांगी पाटलांचा पराभव केला आहे. या विजयानंतर सत्यजीत तांबेंचे (Satyajeet Tambe) वडिल सुधीर तांबे (Sudhir Tambe)यांनी प्रतिक्रिया देत जनतेचे आभार मानले आहेत.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुधीर तांबे म्हणाले की, “मी तेरा वर्ष या मतदारसंघातून निवडून गेलो आहे. येथील लोकांनी खूप प्रेम दिलं आहे. सत्यजीतवर विश्वास दाखवत आमच्या परिवारावही विश्वास टाकला आहे. जनतेचे प्रश्न सोडवणे हेच सत्यजीतचं उद्दिष्ट असंल पाहिजे.”
“मी पहिल्या वेळेस अपक्ष निवडून आलो होते. सत्यजीतही अपक्ष निवडून आला आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसकडे गेली, असं म्हणता येणार नाही. पुढं काय होतं ते पाहूयात. राजकीय भविष्य आपल्याला घडवावं लागतं, ते पक्षावर अवलंबून नसते. म्हणून सत्यजीतने जास्तीत जास्त लोकांना जोडत अभ्यासपूर्ण रितीने विधिमंडळात काम करावे,” असा सल्ला सुधीर तांबेंनी दिला आहे.
काँग्रेसने सत्यजीतला उमेदवारी दिली असती तर असं काही घडलंच नसतं, अशा कानपिचक्या’, विरोधी पक्षनेते अजित पवारांनी दिल्या आहेत. याबद्दल विचारल्यावर सुधीर तांबेंनी सांगितलं, “शरद पवारांनी यापूर्वीही भूमिका मांडली होती की, सामंजस्यपणाने हा प्रश्ना सोडवता आला असता. तिच भूमिका अजित पवारांनी मांडली आहे. आम्हाला खूप वाईट वाटलं. कारण, वर्षोनुवर्षे आम्ही त्या पक्षाता काम करत आहे. संवादाद्वारे हा प्रश्न मिटला असता.” एबी फॉर्म हा माझ्या नावाने आला होता,” असं स्पष्टीकरणही सुधीर तांबेंनी दिलं.
सत्यजीत तांबे काँग्रेस की भाजपाला पाठिंबा देणार असं विचारल्यावर सुधीर तांबेंनी म्हटलं, “सध्या सत्यजित अपक्षच आहे. माझा सल्ला आहे की त्यानं अपक्षच राहावं. पण, याबद्दल आमच्या परिवारात चर्चा करून पुढील निर्णय घेऊ.
Web Title: Will Satyajeet Tambe support Congress or BJP
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App