संगमनेर: प्रतिबंधित पानमसाला, सुगंधी तंबाखूची विक्री, तीन जणांविरुद्ध गुन्हा
Sangamner Crime News: Ahmednagar अन्न व औषध प्रशासनाची कारवाई, तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल, ६ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized).
संगमनेर: प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधी तंबाखूची विक्री होत असलेल्या दोन दुकानांवर अहमदनगर येथील अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत ६ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि. ३१) दुपारी सव्वाबारा ते एक वाजेच्या सुमारास संगमनेर शहरात करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फईम बालम पठाण (वय २५, रा. साईश्रद्धा चौक, मालदाड रस्ता, संगमनेर), मुबीन खलील शेख (वय ३४, रा. एकतानगर, जोर्वे रस्ता, संगमनेर), अफ्रिदी पठाण (रा. रहमतनगर, संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
संगमनेरातील काही दुकानांमध्ये प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधी तंबाखूची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अहमदनगर येथील अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी येथे आले. त्यांनी कारवाईच्या उद्देशाने काही दुकानांची तपासणी केली असता दोन दुकानांमध्ये त्यांना प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधी तंबाखूची विक्री होत असल्याचे निर्दशनास आले. त्यांनी कारवाई करत ६ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही दोन्ही दुकाने सील करण्यात आल्याचे अन्न सुरक्षा अधिकारी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव यांचा देखील कारवाईत समावेश होता. पोलिस उपनिरीक्षक बारकू जाणे अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Sale of prohibited pan masala, aromatic tobacco crime Filed
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App