राजूर: सर्वोदय विद्यालयामध्ये महापुरुषांना अभिवादन
राजूर: आज दिनांक १ ऑगस्ट रोजी गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शिक्षक व विद्यार्थ्यांनी या महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. तुपविहीरे एस.व्ही. यांनी करत या दोन महापुरुषांचे कार्य व्यक्त केले. श्री. संतराम बारवकर यांनी यांचे जीवन कसे महान आहे याविषयी त्यांची महती सांगितली. विद्यालयाचे प्राचार्य श्री. लेंडे एम. डी. यांनी आपल्या भाषणातून वंचितांसाठी काय करता येईल का? युवकांमध्ये स्फूर्ती निर्माण व्हावी, या महापुरुषांचे कार्य आपल्यामध्ये यावे यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे असा संदेश व्यक्त केला. तर विद्यालयाचे उपप्राचार्य श्री. पर्बत एल. पी. यांनी या महापुरुषांचे जीवनकार्य व्यक्त केले. त्याचबरोबर श्रीमती सावंत बीना यांनी आपल्या भाषणातून ज्ञानाने कसा माणूस मोठा होतो याचे दाखले दिले. तसेच या कार्यक्रमप्रसंगी विद्यार्थिनी पायल बेनके या विद्यार्थिनीने आपले भाषण व्यक्त करत अभिवादन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री. संतराम बारवकर व श्री.मढवई आर. आर., श्री.अमोल तळेकर यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी विद्यालयाचे उप प्राचार्य श्री. पर्बत एल. पी. हे होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय सूचना श्री.मढवई आर. आर. यांनी मांडली तर अनुमोदन श्री. अजित गुंजाळ यांसकडून देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. शुभांगी बांडे हिने केले. या कार्यक्रमप्रसंगी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे आभार श्री. शेंडगे आर.एन. यांनी मानले.
Website Title: Svm Rajur Greetings to the great men

















































