संगमनेर तालुक्यात चोरी घरफोड्यांचे सत्र अजूनही सुरूच
Sangamaner Theft: संगमनेर तालुक्यात शहरासह विविध भागात घरफोडया, चो-या, घरफोडया, चो-या, सत्र अजूनही सुरूच, धांदरफळ येथे चोरट्यांनी घरफोडी करत दोन तोळे सोन्यासह ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास.
संगमनेर: संगमनेर शहर आणि तालुक्यात दरोडे, चोरी घरफोड्यांचे सत्र अजूनही सुरूच आहे. संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील धांदरफळ येथे चोरट्यांनी घरफोडी करत दोन तोळे सोन्यासह ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
धांदरफळ बुद्रुक येथे पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी अफसर बालम तांबोळी यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी कपाटातील सोन्याचे गंठण व शोकेसमध्ये ठेवलेल्या पैशाच्या डब्यात ठेवलेले असे
दोन तोळे सोने व एकूण ५२ हजार रुपये चोरून नेण्यात आले. अफसर तांबोळी यांच्या फिर्यादीवरून पोलीस उपनिरीक्षक डी. बी. घोडे हे पुढील तपास करत आहेत.
Business Idea | तुम्हाला तुमचा स्वतः चा बिजनेस सुरु करायचा मग हा व्हिडियो जरूर पहा
संगमनेर शहरातील इंदिरानगर येथील योगेश विलास गोसावी यांची होंडा कंपनीची लाल रंगाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरून रवीवारी मध्यरात्री चोरून नेली. जालिंदर काशिनाथ थिटमे माजी वरिष्ठ शासकीय अधिकारी ((रा. गोल्डनसिटी) यांची राहुलकुमार नामक व्यक्तीने फोन करून व विश्वास संपादन करून मोबाईल वर कोड शेअर करण्यास सांगून त्यांची ८० हजारांची फसवणूक केली. आशा प्रकारे रोज शहर व तालुक्यात वेगवेगळ्या माध्यमातून नागरीकांची लुटमार होत आहे.
ग्रामीण भागातही दररोज कुठे ना कुठे चोर, दरोडेखोर लुटमार करत आहेत. निमोण येथील सरपंचांच्या घरी देखील १४ लाखांची चोरी झाली होती. एकंदरीत ग्रामीण भागातील चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
Web Title: Theft season continues in Sangamner taluka
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App