Home संगमनेर संगमनेरचे दोन वाळू तस्करांना जिल्ह्यातून केले हद्दपार

संगमनेरचे दोन वाळू तस्करांना जिल्ह्यातून केले हद्दपार

Sangamner: दोन वाळू तस्करांना एका वर्षाच्या कालावधीकरिता जिल्ह्यातून हद्दपार (deported) प्रांताधिकाऱ्यांची कारवाई.

Two sand smugglers of Sangamner were deported from the district

संगमनेर: संगमनेरातील दोन वाळू तस्करांना एका वर्षाच्या कालावधीकरिता जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. धांदरफळ खुर्द आणि जोर्वे रस्ता येथील हे वाळूतस्कर आहेत. अशी माहिती संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.

सागर उर्फ शक्तिमान तुकाराम कोकणे (रा. धांदरफळ खुर्द, ता. संगमनेर), अरबाज करीम शेख (रा.जोर्वे रस्ता, संगमनेर) अशी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या दोघांची नावे आहेत. हद्दपार करण्यात आलेल्या कोकणे आणि शेख यांच्या विरोधात संगमनेर तालुक्यातील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. संबंधित पोलिस ठाण्यातून या दोघांच्या हद्दपारीचे प्रस्ताव आले होते, त्यानंतर उपविभागीय अधिकारी डॉ. मंगरुळे यांच्या आदेशाने त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली.

Business Idea | तुम्हाला तुमचा स्वतः चा बिजनेस सुरु करायचा मग हा व्हिडियो जरूर पहा

कोकणे याला ४ ऑक्टोबर २०२२ च्या आदेशान्वये ६ ऑक्टोबर २०२२ ते ५ ऑक्टोबर २०२३ या एका वर्षांच्या कालावधीकरिता तर शेख याला 3 जानेवारी २०१३ च्या आदेशान्वये ६ जानेवारी २०२३ ते ५ जानेवारी २०२४ या एका वर्षाच्या कालावधीकरिता हद्दपार केले आहे. अशीही माहिती तहसीलदार निकम यांनी दिली.

Web Title: Two sand smugglers of Sangamner were deported from the district

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here