हवामान अंदाज! राज्यात पुढील ४८ तासांत…. Weather Alert
Weather Alert: पुढील दोन तीन दिवसांत थंडी वाढण्याची शक्यता. बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला, अहमदनगरमध्ये (Ahmednagar) कमाल तापमान 29 अंश तर किमान 16 अंश सेल्सियस असेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मुंबई: बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा आता उत्तरेकडे सरकला असून पुढील 48 तासात दक्षिणेकडून किनारी भागाकडे सरकणार आहे. यामुळे बाष्पयुक्त वारे कमी होणार आहेत. या थंड वाऱ्यांचा प्रभाव पुढील दोन ते तीन दिवसात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन दिवसात कोकणात गारठा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा थंडीची लाट पसरली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांनी मुंबईमध्येही वीकेण्डला सुखद वातावरणाची निर्मिती केली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका कमी झाला होता. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे. मात्र, त्याचे प्रमाण अजूनही कमी आहे. पहाटे आणि सकाळी थंडी जाणवत आहे. त्यानंतर दुपारपासून संध्याकाळपर्यंत उकाडा जाणवत आहे. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी थंडी असे वातावरण आहे.
पुणेप्रमाणेच नाशिकमध्येही थंडीचा कडाका वाढलाय. नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये 16.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झालीय. तर नाशिकमध्ये किमान 16 अंश सेल्सियस तापमान राहण्याचा अंदाज आहे. तर, अहमदनगरमध्ये कमाल तापमान 29 अंश तर किमान 16 अंश सेल्सियस असेल, असा अंदाज आहे.
जाहिरात: आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation. भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC. सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.
Web Title: Weather Alert Maharashtra next 48 hours
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App