सोमवारपासून गारठा वाढणार, नाताळ थंडीने कुडकुडणार
येत्या तीन ते चार दिवसांमध्ये तो काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात दाखल होईल आणि त्यानुसार आपल्याकडे पुन्हा एकदा सोमवारपासून थंडीला सुरुवात.
मुंबई : तुर्कस्तान, युक्रेन, भूमध्य समुद्र आणि काळा समुद्र यातून उगम पावलेला पश्चिमी झंझावात पाकिस्तानपर्यंत पोहोचला असून, येत्या तीन ते चार दिवसांमध्ये तो काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात दाखल होईल आणि त्यानुसार आपल्याकडे पुन्हा एकदा सोमवारपासून थंडीला सुरुवात होईल. विशेष म्हणजे ही थंडी नाताळपर्यंत टिकून राहील.
अरबी समुद्रात क्षीण अवस्थेत उरलेले मॅन-दाँस वादळाचे अवशेष पुन्हा विकसित होऊन येमेन ओमान किलागानीक मार्गस्थ होतील.
बंगालच्या उपसागरातील नवीन कमी दाब क्षेत्राचा महाराष्ट्रावर फार काही परिणाम होणार नाही. सध्या प्रवासात असलेले व पाकिस्तानपर्यंत पोहोचलेले पश्चिमी झंझावात येत्या ३-४ दिवसांत काश्मीर, हिमाचल, उत्तराखंडात दाखल होईल.
Earn Money Online | सोशियल मेडिया मनोरंजनासोबत पैसे कमविण्याचा फंडा | जाणून घ्या
महाराष्ट्रात त्याचदरम्यान मॅन- दौंस वादळातील ढगाळ वातावरणाचा प्रभाव नामशेष होईल. त्यामुळे महाराष्ट्रात अगोदरच सरासरीपेक्षा ५ अंशांनी वाढलेल्या किमान तापमानात हळूहळू तेवढीच घसरण होऊन सोमवारपासून थंडीत वाढ होईल, असे निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.
Web Title: Hail will increase from Monday, Christmas will be cold
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App