नाशिक पुणे महामार्गावर घाटात कारचा भीषण अपघात, पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू
Accident: मोहदरी घाटात कारचा टायर फुटून भीषण अपघात झाल्याची घटना, पाच नाशिकच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू.
सिन्नर: नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर येथील मोहदरी घाटात कारचे टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात पाच विद्यार्थ्यांचा करुण अंत झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 9) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. नाशिकच्या सिडको, पाथर्डी फाटा परिसरातील हे विद्यार्थी आहेत.
हर्ष ऊर्फ आदित्य दीपक बोडके (वय 17, रा. कामटवाडे, सिडको, नाशिक), सायली अशोक पाटील (17, रा. राणेनगर, सिडको, नाशिक), प्रतीक्षा दगू घुले (17, पाथर्डी फाटा, नाशिक), मयुरी अनिल पाटील (16, रा. त्रिमूर्ती चौक, सिडको, नाशिक), शुभम तायडे (17, शिवशक्ती चौक, सिडको, नाशिक) अशी मयत विद्यार्थ्यांची नावे आहेत.
अपघात इतका भीषण होता की, अपघातग्रस्त गाडीचा चक्काचूर झाला आहे. अपघातात तीन मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे. अपघातात साक्षी नितीन घायाळ (18, पाथर्डी फाटा, नाशिक) व साहिल गुणवंत वारके (18, रा. लक्ष्मी रेसिडेन्सी, पाथर्डी फाटा, नाशिक) या दोन विद्यार्थ्यांसह अन्य वाहनांतील गायत्री अनिल फरताळे (रा. उंटवाडी, नाशिक)व सुनील ज्ञानेश्वर दळवी (रा. पुणे) जखमी झाले आहेत. प्राथमिक उपचारानंतर जखमींना नाशिक येथे हलविण्यात आले.
Business Idea | शेतीसंबंधित हा व्यवसाय सुरु करून दर दिवस हजारोंची कमाई करण्याची संधी
सिन्नरकडून नाशिकच्या दिशेने भरघाव वेगाने येत असलेल्या कारचा (एमएच 03 एआर 1615) टायर फुटला आणि ती विरुद्ध दिशेला जात डिव्हायडर ओलांडून थेट दोन कारवर जाऊन आदळून उलटली. त्यात पाचजणांचा मृत्यू झाला.
Web Title: Car accident in ghat on Nashik Pune highway, five students died
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App