अहमदनगर: सोशियल मेडियाच्या ओळखीतून तरुणीवर अत्याचार, बळजबरीने गर्भपात
Ahmednagar Rape Case: सोशियल मेडियाच्या ओळखीतून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना. गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून गर्भपात
अहमदनगर: सोशल मीडियावर ओळख झालेल्या युवतीला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित युवती गर्भवती राहिल्यानंतर तिला बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून गर्भपात करण्यास प्रवृत्त केले.
याप्रकरणी पीडित युवतीने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ऋषिकेश अर्जुन दहिफळे (रा. नांदुरनिंबा दैत्य, ता. पाथर्डी) याच्यावर अत्याचार, अॅट्रोसिटी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुळची अमरावती जिल्ह्यातील फिर्यादी युवती सध्या पारनेर तालुक्यातील एका कंपनीत नोकरीला आहे. जून 2022 मध्ये इंस्टाग्रामवर तिची ओळख ऋषिकेश अर्जुन दहिफळे सोबत झाली. त्यांनी एकमेकांचा मोबाईल नंबर घेतला. त्यांचे नेहमी फोनवर बोलणे होत होते.
एकमेकांवर विश्वास बसल्याने त्यांचे प्रेमसंबंध जुळले. ऋषिकेशने फिर्यादी युवतीचा विश्वास संपादन केला. ऋशिकेशने युवतीला नगर येथे त्याच्या बहिणीकडे बोलून घेतले. युवती त्याच्यावर विश्वास ठेऊन नगरमध्ये आली असता ऋषिकेशने तिला बहिणीकडे घेऊन न जाता नगर शहरातील एका लॉजवर नेले. ऋषिकेशने त्याच्या बहिणीसोबत युवतीचे फोनवरून बोलणे करून दिले. तसेच तो युवतीला म्हणाला, तुझ्यासोबत लग्न करणार आहे, असे सांगून शारिरीक संबंध करण्याची इच्छा व्यक्त केली.
पीडित युवतीची इच्छा नसतानाही ऋषिकेशने तिच्यासोबत संबंध ठेवले. युवतीने त्याच्याकडे लग्न करण्याबाबत विचारणा केली असता तो तिला म्हणाला, दोन तीन दिवस थांब, माझे घरच्यांना विचारून त्यांची परवानगी घेऊन आपण लग्न करू, असे सांगितले. ऋषिकेशने चार दिवस पीडित युवतीला त्या लॉजवर ठेऊन शरिरसंबंध ठेवले. तिची त्याच्या घरच्यांसोबत भेट घालून दिली नाही. दरम्यान पीडित युवती तेथून निघून गेल्यानंतर ती गर्भवती असल्याची माहिती तिला समजली. तिने यासंदर्भात ऋषिकेशला माहिती दिली असता त्याने बळजबरीने गर्भपात करण्याच्या गोळ्या खाण्यास दिल्या.
गर्भपात करण्यास प्रवृत्त केले. पीडितीने प्रेमसंबंधाची माहिती तिच्या घरच्यांना दिली. लग्न करणार असल्याचे सांगितले. तिला लग्न करण्यास तिच्या घरच्यांनी परवानगी दिली. पीडित युवतीने ऋषिकेशकडे लग्न करण्यासाठी विचारणा केली असता व त्याबाबत तगादा लावला असता तो पीडितीला म्हणाला, तु वेगळ्या जातीची आहे त्यामुळे मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही, असे सांगून लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. म्हणून पीडित युवतीने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद देत ऋषिकेश विरोधात अत्याचार, अॅट्रोसिटी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Web Title: Rape Case Abuse of young woman, forced abortion through social media identity
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App